Spread the love


शिरोळ/प्रतिनिधी
शिरोळ तालुक्यात गेल्या 24 तासात 3 मिली मिटर तर कोल्हापुर जिल्ह्यात गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक जास्त 100.3 मिमि पाऊसाची नोंद झाली आहे.
जिल्ह्यातील 65 बंधारे पाण्याखाली असुन राधानगरी धरणातून 1400 क्युसेक पाण्याचा विसर्ग आहे. आपल्या जिल्ह्यातील राधानगरी 5.56 टीएमसी, तुळशी 2.16 टीएमसी, वारणा 22.36 टीएमसी, दूधगंगा 12.93 टीएमसी, कासारी 1.96 टीएमसी, कडवी 2.09 टीएमसी, कुंभी 1.57 टीएमसी, पाटगाव 2.97 टीएमसी, चिकोत्रा 0.74 टीएमसी, चित्री 1.50 टीएमसी, जंगमहट्टी 1.22 टीएमसी, घटप्रभा 1.56 टीएमसी, जांबरे 0.82 टीएमसी, आंबेआहोळ 1.11 टीएमसी, सर्फनाला 0.39 टीएमसी व कोदे लघु प्रकल्प 0.21 टीएमसी इतका पाणीसाठा आहे.

तसेच बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे आहे. राजाराम 29.8 फूट, सुर्वे 29.8 फूट, रुई 58.8 फूट, इचलकरंजी 54.6 फूट, तेरवाड  49 फूट, शिरोळ 38 फूट, नृसिंहवाडी 36 फूट, राजापूर 25.3 फूट तर नजीकच्या सांगली 11 फूट व अंकली 15.11 फूट अशी पाणी पातळी आहे.