मुंबई 6 मे
जून महिन्यापासून आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2024 चे बिगुल वाजणार आहे. 1 ते 29 जून दरम्यान ही स्पर्धा होणार असून क्रिकेट चाहत्यांमध्ये याबाबत मोठा उत्साह आहे. परंतु असे असतानाच टी 20 वर्ल्ड कपवर दहशतवादी हल्ला करण्याची धमकी मिळाली आहे. या धमकीमुळे एकच खळबळ उडाली असून स्पर्धा तोंडावर असताना आंतरराष्ट्रीय क्रिकेट बोर्डाची चिंता वाढली आहे.
1 जून ते 29 जून या दरम्यान अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये टी 20 वर्ल्ड कप 2024 खेळवला जाणार आहे. या वर्ल्ड कपसाठी एक एक करून सर्व देश आपल्या टीमची घोषणा करत आहेत. वर्ल्ड कपसाठी अवघे काही दिवस शिल्लक असताना क्रिकबझच्या रिपोर्टनुसार वेस्टइंडीज क्रिकेट बोर्डाला उत्तर पाकिस्तानमधून टी 20 वर्ल्ड कप सामन्या दरम्यान दहशतवादी हल्ल्याचा अलर्ट मिळालेला आहे. मिळालेल्या माहितीनुसार आयएस म्हणजेच प्रो इस्लामिक स्टेट वेस्ट इंडिजमध्ये होणाऱ्या सामन्यादरम्यान दहशतवादी हल्ल्याचे प्लॅनिंग करत आहे.
सुरक्षा अलर्टने सांगितले की, ‘प्रो-इस्लामिक स्टेटने स्पोर्टिंग इवेंट्स’च्या विरोधात हिंसा भडकवण्याचे अभियान सुरु केले असून यात अफगाणिस्थान, पाकिस्तानची शाखा, आयएस खुरासानच्या व्हिडीओ द्वारे मिळालेल्या संदेशांचा समावेश आहे.
सीईओ जॉनी ग्रेव्सने क्रिकबझशी बोलताना सांगितले की, यंदा वर्ल्ड कप आयोजित होणाऱ्या देशांमध्ये आणि शहरांमध्ये आम्ही अधिकारायणसोबत मिळून काम करत आहोत. सोबतच यात कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी पूर्ण योजना आखत असून खबरदारी घेत आहोत. तर एका वृत्तपत्राने प्रधानमंत्री कीथ रोवलेचा हवाला देत लिहिले की, सुरक्षा एजन्सी वर्ल्डकपवर येणाऱ्या संकटांशी सामना करण्यासाठी संभावित धोक्यांवर लक्ष ठेऊन आहे.
यंदाच्या टी 20 वर्ल्ड कपमधील सामने हे वेस्ट इंडिजमधील एंटीगा एंड बारबुडा, बारबाडोस, गुयाना, सेंट लूसिया, सेंट विंसेंट एंड ग्रेनेडाइंस आणि त्रिनिदाद एंड टोबैगो येथे होतील. तर अमेरिकेच्या फ्लोरिडा, न्यूयॉर्क आणि डलास येथे देखील वर्ल्ड कपचे सामने होणार आहेत. सेमी फायनलचे सामने त्रिनिदाद आणि गुयाना तर फायनलच असमान हा बारबाडोस येथे खेळवला जाईल.