Spread the love

मुंबई 6 मे

बॉलिवूडचा मल्टिटॅलेंडेट म्हणून ओळखले जाणारे अभिनेते मनोज वाजपेयी एका नव्या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाले आहेत. मनोज वाजपेयी यांचा ‘भैया जी’ हा सिनेमा येतोय. सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. इतर सिनेमांसारखाच मनोज वाजपेयी यांचा हा सिनेमा देखील वेगळा ठरणार आहे. मनोज वाजपेयी यांनी त्यांच्या आतापर्यंतच्या सिनेमात अनेक वेगवेगळ्या भुमिका साकारल्या आहेत. मनोज बापजेयी हे एक असे अभिनेते आहेत जे कोणत्याही भुमिकेत प्रेक्षकांसमोर आले तरी प्रेक्षक त्यांचा स्वीकारत करतील. ‘भैया जी’मध्येही त्यांची एक वेगळी भुमिका प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

‘भैया जी’ हा सिनेमा मनोज वाजपेयी यांच्यासाठी खास आहे कारण हा त्यांचा 100 वा सिनेमा आहे. सिनेमाचं आणखी एक खास वैशिष्ट्य म्हणजे या सिनेमाची निर्मिती त्यांच्या पत्नीने केली आहे. तब्बल 15 वर्षांनी त्यांच्या पत्नीने कमबॅक केले आहे.

सिनेमाच्या टीझरमध्ये दोन लोकांमधील वैर पाहायला मिळते. एका खुनाचे प्रकरण असून मनोज वाजपेयीच्या भावाचा खुन झाला आहे. आपल्या भावाच्या खुनाचा बदला घेण्यासाठी मनोज वाजपेयी एक्शन मोडमध्ये दिसत आहेत. ‘भैया जी’ असं मनोज वाजपेयी यांच्या भुमिकेचे नाव आहे. मनोज वाजपेयी यांचा खतरनाक अँटिट्यूट या सिनेमात पाहायला मिळणार आहे. सिनेमाचा ट्रेलर पाहून चाहत्यांनी सिनेमा पाहण्यासाठी उत्सुकता दाखवली आहे.

मनोज वाजपेयी यांची ‘भैया जी’ मधील भुमिका पाहून चाहत्यांनी कमेंट्‌‍सचा वर्षाव केला आहे. एका युझरने लिहिलेय की, मनोज सर अष्टपैलू अभिनेते आहेत. बॉलिवूडचे प्युअर डायमंड. दुसऱ्या युझरने लिहिले आहे की, देवाकडे एकच प्रार्थना आहे मनोज भैयाचा सिनेमा ब्लॉकबस्टर होऊ दे.

मनोज वाजपेयींचा हा सिनेमा 24 मे रोजी रिलीज होणार आहे. ‘प्रतिशोध’ असे स्लोगन देत मनोज वाजपेयी यांनी सिनेमाचा ट्रेलर शेअर केला आहे. सिनेमात मनोज वाजपेयी यांच्याबरोबर अभिनेते सुसुविंदर विक्की, जतिन गोस्वामी, विपिन शर्मा आणि जोया हुसैन हे कलाकार प्रमुख भुमिकेत आहेत.