Spread the love

हातकणंगले / महान कार्य वृत्त सेवा

हातकणंगले लोकसभा मतदार संघातुन अपक्ष निवडणूक लढवण्यासाठी राहुल आवाडे हे आज घोषणा करण्याची शक्यता आहे.
मतदार संघातील तिन आमदारांचा पाठींबा, दोन साखर कारखानदारांनी केलेली विनंती. या ताकदीच्या बळावर युवा नेते राहुल आवाडे आज दुपारी अपक्ष उमेदवारी करण्यासाठी घोषणा करतील असे संकेत प्राप्त झाले आहेत. जयसिंगपूर आणि वारणानगरच्या बैठकीनंतर अपक्ष निवडणूक लढवण्याच्या हालचाली आवाडे समर्थकांनी गतीमान केल्याचे समजते. दुपार पर्यंत आमदार प्रकाश आवाडे, राहुल आवडे यांच्या नावाची घोषणा करतील असे समजुन आल आहे.