Spread the love

कोल्हापूर:
लोकसभा 2024 निवडणूकीसाठी शिवसेनेच्या पुढील उमेदवारांची घोषणा….

  • 1) बुलढाणा – प्रा. नरेंद्र खेडेकर
  • 2) यवतमाळ-वाशिम – श्री. संजय देशमुख
  • 3) मावळ – श्री. संजोग वाघेरे पाटील
  • 4) सांगली – श्री. चंद्रहार पाटील
  • 5) हिंगोली – श्री. नागेश पाटील आष्टीकर
  • 6) संभाजीनगर – श्री. चंद्रकांत खैरे
  • 7) धारशीव – श्री. ओमराजे निंबाळकर
  • 8) शिर्डी – श्री. भाऊसाहेब वाघचौरे
  • 9) नाशिक – श्री. राजाभाऊ वाजे
  • 10) रायगड -श्री. अनंत गीत्ो
  • 11) सिंधुदुर्ग – रतागिरी – श्री. विनायक राऊत
  • 12) ठाणे – श्री. राजन विचारे
  • 13) मुंबई – ईशान्य – श्री. संजय दिना पाटील
  • 14) मुंबई – दक्षिण – श्री. अरविंद सावंत
  • 15) मुंबई- वायव्य – श्री. अमोल कीर्तिकर
  • 16) परभणी – श्री. संजय जाधव

उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेने 16 लोकसभा मतदारसंघाची यादी बुधवारी सकाळी प्रसिद्ध केली. परंतु या यादीमध्ये हातकणंगले मतदारसंघातून नाव घोषित केलेले नाही. त्यामुळे या जागेचा सस्पेन्स कायम आहे. कदाचित वंचित बहुजन आघाडी यांच्यासोबत बोलणी सुरू असल्याने या मतदारसंघातील नाव लांबणीवर टाकल्याचे कळते. वंचित आघाडीने नकार दिल्यास हातकणंगलेतून माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर यांचे नाव निश्चित मानले जाते. दरम्यान सांगली मतदारसंघातून डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना उमेदवारी देऊन काँग्रेसला एक प्रकारे ठाकरे यांनी धक्का दिलेला आहे. याचा परिणाम ही हातकणंगले मतदारसंघात होऊ शकतो.