इचलकरंजी इंडिया आघाडी शिष्टमंडळाची आमदार जयंत पाटील यांच्याकडे मागणी
इचलकरंजी/ प्रविण पवार
इचलकरंजी येथील इंडिया आघाडीच्या शिष्टमंडळाने आज आमदार सतेज पाटील यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट घेत हातकणंगले लोकसभेसाठी उपरा उमेदवार न देता इंडिया आघाडीतील घटक पक्षाचाच उमेदवार द्यावा अशी आग्रही मागणी केली.यावर जयंत पाटील यांनी हातकणंगलेची जागा शिवसेनेकडे आहे याबाबतचा निर्णय उध्दव ठाकरे हे घेणार आहेत .तरीही इचलकरंजीच्या कार्यकत्याच्या भावना महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये सांगून दोन दिवसात हातकणंगलेच्या उमेदवाराबाबत निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. शिष्टमंडळात मदन करंडे, नितीन जांभळे ,उदयसिंह पाटील,प्रकाश मोरबाळे, संजय कांबळे, भरमा कांबळे ,सदा मलाबादे , संभाजी नाईक यांचेसह इंडिया आघाडीचे नेते उपस्थित होते