Spread the love


मुंबई,17 मार्च
’’राजाचा आत्मा आत्मा, ईडी, सीबीआय यांसारख्या संस्थांमध्ये आहे. ईव्हीएमध्ये यांचा आत्मा आहे. यांची 56 इंच छाती नाहीच’’, अशी घणाघाती टीका काँग्रेस नेते राहुल गांधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली आहे. लोकसभा निवडणुकीचा नारळ फोडण्यासाठी शिवाजी पार्कवर इंडिया आघाडीची सभा पार पडली. यावेळी ते बोलत होते. या सभेच्या माध्यमातून राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेची सांगताही झाली आहे. यावेळी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, शरद पवार गटाचे प्रमुख शरद पवार, काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी, बिहारचे विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव, जम्मू काश्मीरमधील नेत्या महेबुबा मुफ्ती, वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर आदी नेते उपस्थित होते.
बरोजगारी, हिंसा, द्वेष यासारखे मुद्दे तुम्हाला मीडियामध्ये दिसत नाहीत
राहुल गांधी म्हणाले, भारत जोडो न्याय यात्रा आम्हाला करावी लागली कारण देशात संवादाचे सिस्टिम देशातील लोकांच्या हातात राहिलेली नाही. बरोजगारी, हिंसा, द्वेष यासारखे मुद्दे तुम्हाला मीडियामध्ये दिसत नाहीत. त्यामुळे आम्हाला ही यात्रा करावी लागली. कारण कोणताच पर्याय नव्हता. देशाच्या लक्षात आणून देणयासाठी आम्हा सर्वांना 4 हजार किलोमीटर चालावे लागले. सोशल मीडियावरही यांचे नियंत्रण आहे. अमेरिकेतील कंपन्यांवर दबाव असल्याचा दावाही यावेळी राहुल गांधी यांनी केला.
आपण एका शक्तीविरोधात लढत आहोत
राहुल गांधी पुढे बोलताना म्हणाले, लोकांना वाटते आम्ही राजकीय पक्षाविरोधात लढत आहोत. हे खरे नाही. आम्ही राजकीय पक्षातून लढत नाहीत. हे भारतातील युवकांना समजून घेण्याची गरज आहे. आम्ही सर्वजण नरेंद्र मोदी यांच्याविरोधात किंवा भाजपविरोधात लढत नाहीत. आपण एका शक्तीविरोधात लढत आहोत. राजाची आत्मा ईव्हीएममध्ये आहे. ईडी आणि सीबीआयमध्ये यांचा आत्मा आहे. माझ्या आईकडे एका नेत्याने रडत सांगितले की, या शक्तीविरोधात लढण्याची हिंमत नाही. असे हजारो लोक आहेत. ज्यांना घाबरवण्यात आला आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीचे लोकं असेच गेले नाही. ज्या शक्तीचा मी उल्लेख करत आहे त्यांनी या लोकांचा गळा पकडून त्यांना भाजपसोबत घेतलं आहे. त्यामुळे हे सगळे लोक घाबरून भाजपसोबत गेले आहेत, असंही राहुल गांधी यांनी नमूद केलं.
मणिपूरमध्ये भाऊ भावाला गोळी मारतोय
नरेंद्र मोदी, भाई और बहनों हा फक्त एक चेहरा आहे. चित्रपटातील नायकाप्रमाणे त्यांना एक रोल दिला गेला आहे. 56 इंचची छाती नसून खोकला आहे. मला विचारण्यात आलं तुमची यात्रा कुठून कुठपर्यंत होईल. मी विचार केला, मात्र एक ठरलं होतं यात्रा मणिपूरमधून सुरुवात होईल. तिथे भाऊ भावाला गोळी मारत आहे. तिथूनच यात्रेची सुरुवात करण्याचा ठरवलं. तसेच, यावेळी मी विचार केला भारताला नवीन व्हिजन द्यायचा असेल, यात्रेचे समारोप धारावीत झालं पाहिजे. धारावीत टॉयलेट आहे, आज या धारावीमधील लोकांना ती शक्ती त्यांच्या घरातून बाहेर काढून फेकत आहे, असा दावाही राहुल गांधी यांनी केला.
10 दिवसांत एका लग्नासाठी विमानतळ सुरू होतं
देशात 22 अशी लोक आहेत, ज्यांच्याकडे एवढी संपत्ती आहे जेवढी देशातील 170 कोटी लोकांकडे आहे. भारतात आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू करण्यासाठी अनेक वर्षे लागतात. मात्र,10 दिवसांत एका लग्नासाठी विमानतळ सुरू होतं. लग्नासाठी विमानतळ सुरू करताय करा, पण देशातील इतर भागात देखील विमानतळ सुरू करा. या लोकांनी काय चुकी केली आहे.