Spread the love

कुरुंदवाड : प्रतिनिधी.
सांगली येथील संतोष कदम हत्या प्रकरणातील तीन आरोपींना कुरुंदवाड पोलिसांनी गजाआड करत आज शनिवारी सकाळी येथील प्रथमवर्ग न्यायालयात उभे केले असता 14 तारखेपर्यंत पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. कदम यांनी महापालिकेत नोकरी लावतो असे सांगून संशयित आरोपीशी आर्थिक व्यवहार केला होता.या आर्थिक वादातूनच हत्या केल्याचे तपासात पुढे आले आहे.
याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या नितेश दिलीप वराळे(वय.30),सुरज प्रकाश जाधव(वय.20,दोघे,रा.सिद्धार्थ परिसर, सांगली) तुषार महेश भिसे(वय.20,आकाशवाणी केंद्राजवळ सांगली)अशी संशयित आरोपींची नावे आहेत.
सांगली येथील बेपत्ता माहिती अधिकार कार्यकर्ता संतोष विष्णु कदम (वय 36 रा.गावभाग सांगली)याचा धारदार चाकूने वार करुन खून झाल्याची खळबळजनक घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली.कदम याचा रक्तबंबाळ अवस्थेतील मृतदेह मारुती स्वीफ्ट या चारचाकी वाहनात आढळून आला. खून करुन हल्लेखोर वाहन रस्त्यावर सोडून पसार झाले होते.
संशयीत आरोपी नितेश वराळेला सांगली महानगरपालिकेत नोकरीस लावण्यासाठी संतोष कदमशी आर्थिक व्यवहार झाला होता.नोकरीचे काम न झाल्याने वराळेने कदमकडे पैशाचा तगादा लावला होता.10 ते 12 दिवसांपूर्वी दोघांच्यात वाद झाला होता.कदमने गुरुवारी पैसे देण्याचा वायदा केला होता.पैसे न दिल्याने तिघांनी चाकूने भोकसून वर्मी घाव घालून कदमची हत्या केली. आणि वाहनासह मृतदेह नांदणी रस्त्यावर सोडून तिघांनी पलायन केले.संशयित आरोपी वराळे,जाधव या दोघांना समडोळी ता.मिरज येथून तर भिसे याला सांगली येथे कोल्हापूर रस्त्यावरून ताब्यात घेऊन अटक केली आहे.शनिवारी या तिघांना कुरुंदवाड येथील न्यायालयात उभे केले असता 5 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
प्रतिक्रिया.
पत्रकारांशी बोलताना पोलीस उप अधीक्षक समीरसिंह साळवे म्हणाले हत्या प्रकरणातील तीन आरोपींना जेरबंद करण्यात यश आले असून आरोपींच्या कडून प्रथमदर्शनी माहिती घेतली असता आर्थिक देवाणघेवाणीतून हा खून केल्याचे कबुली कबुली दिली आहे संशयित आरोपी हे सांगली जिल्ह्यात त्यांच्यावर वेगवेगळे गुन्हे दाखल असून ते गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असल्याचे सांगितले. यातून आणखी काही धागेदोरे हाती लागण्याची शक्यता वर्तवली