काल रात्री श्री दत्त साखर कारखान्यात बेअरिंग चोरी करताना एक अधिकारी कारखाण्यातील कर्मचाऱ्यांना सापडला असल्याचे व त्या अधिकाऱ्यांस रात्रीच आपण कामावरून कमी केल्याची चर्चा सभासदांच्यात आहे.
श्री दत्त साखर कारखाना हा सभासद शेतकऱ्यांच्या घामातुन उभा राहिला आहे. काल रात्री घडलेली चोरीची घटना कामगार सांगतात त््यााप्रमाणे जर खरोखर घडली असेल व उपस्थित सर्व कामगारांनी पाहिली असेल, तर ही फार गंभीर बाब आहे.
एखादा अधिकारी कारखाण्यातील किमती साहित्य चोरी करतो. आणि त्याच्यावर साधी निलंबणाची कारवाई करून सोडून दिले जात असेल, तर हे त्यापेक्षाही गंभीर आहे. आपण विश्वस्त म्हणून रात्रीच पोलीस स्टेशनला फिर्याद आवश्यक होत्ो. कारण यापूर्वीही त््याच अधिकाऱ्याकडून आणखी साहित््या नेले असण्याचा संभव आहे. तरी लवकरात लवकर पोलीस स्टेशन मध्ये फिर्याद द्यावी व जर हे प्रकरण घडले नसेल तर सबंधित अधिकाऱ्यांना कामावरून तातडीने का काढून टाकले याचा खुलासा करावा अशी मागणीचे निवेदन अंदोलन अंकुशने कार्यकारी संचालक एम व्हि.पाटील यांना दिल आहे. तरी आज बोर्ड मिटींग आहे त्यापुढे विषय ठेवून आणखी कारवाई करू असे अश्वासन कार्यकारी संचालक एम.व्हि.पाटील यांनी अंदोलन अंकुशाल दिल आहे.