Spread the love


ठाणे 4 फेबुवारी (पीएसआय)
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जित्ोंद्र आव्हाड यांच्या ठाण्यातील नाद या बंगल्यात रात्री बॉम्ब असल्याचा एक निनावी फोन आला. या फोनमुळे एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर बॉम्बशोधक पथकानं तपासणी केल्यानंतर काहीच निष्पन्न झालं नाही. मात्र दोन दिवसांपूर्वी मुंबईमध्ये आव्हाड यांच्या वर हल्ला होण्याची शक्यता असल्याची माहिती वर्तक नगर पोलिसांकडून देण्यात आलीय.
राज्याचे माजी गृहनिर्माण मंत्री अणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जित्ोंद्र आव्हाड यांच्या ठाण्यातील नाद या बंगल्यात रात्री बॉम्ब असल्याच्या एका निनावी फोनमुळे काल रात्री खळबळ उडाली होती. त्या नंतर बॉम्ब शोधक विभागाने तपासणी केली पण काहीही निष्पन्न झाले नाही. दोन दिवसांपूर्वी मुंबईमध्ये आव्हाड यांच्यावर हल्ला होण्याची शक्यता असल्याची धमकी आली होती. या संदर्भात त्यांनी एक ट्वीट देखील केला होत. वर्तक नगर पोलिसांची ही माहिती दिली आहे.
मुंबईत सहा ठिकाणी बॉम्ब
दोनच दिवसांपूर्वी मुंबई वाहत्ूाक पोलीस नियंत्रण कक्षाला अज्ञात व्यक्तीकडून धमकीचा एक मेसेज आला आहे. मुंबईत सहा ठिकाणी बॉम्ब ठेवण्यात आल्याचे त्या मेसेजमध्ये म्हटले आहे. त्यानंतर मुंबई पोलीस आणि इतर यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. संदेश पाठवणाऱ्याचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तसेच सर्व यंत्रणा अलर्ट मोडवर आहेत.
बंगल्याची सुरक्षा व्यवस्था वाढवली
ठाणे पोलिसांच्या कंट्रोलरुमध्येही धमकीचा मेसेज आला. शनिवारी रात्री आव्हाडांचा बंगला बॉम्बने उडवून देण्याचा मेसेज आला होता. त्यानंतर बंगल्याची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आलीय. बॉम्ब शोधक पथके देखील त्ौनात करण्यात आली होती. धमकीचा हा मेसेज करणाऱ्या व्यक्तिचा पोलीस शोध घेत आहेत.