Spread the love

पुलाची शिरोली /प्रतिनिधी कुबेर हंकारे

टोप येथील राष्ट्रीय महामार्गावर कासारवाडी फाटा येथे आयशर ने तीन टू व्हीलर ला धडकून झालेल्या अपघातात दोन गंभीर तर ३ किरकोळ जखमी झाले आहेत हा आपघात आज रविवार दिनांक दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास घडला.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की टोप येथील कासारवाडी फाटा येते महामार्ग ओलाडण्यासाठी तसेच जोतिबा देवस्थान कडे जाण्यासाठी काही भाविक रस्ता क्रॉसिंग ला थांबले होते. यावेळी पुणे हून कोल्हापूर च्या दिशेने जाणाऱ्या आयशर (KA.05.AJ.5701) ने या  बाजूला थांबलेल्या वाहनांना धडक दीलेने परत दुसऱ्या बाजूला गाडी घेतलेने तिथे असलेल्या १ वाहनाला जोराची धडक दिल्याने त्याची गाडी त्या आयशर खाली आलेने दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांना तात्काळ रुग्णवाहकेतून रुग्णालयात पटवण्यात आले. अपघातामुळे महामार्गावर मोठी वाहतूक कोडी पाहायला मिळत लांबच लांब रांगा पाहायला मिळत होत्या तर शिरोली पोलीस व महामार्ग पोलिसांनी म्हामार्ग सुरळीत केला. यावेळी ड्रायव्हर ल मारण्यासाठी काही उत्साही तरुण येत असता टोप गावातील तरुणांनी त्यास एका खोलीत ठेवून सुरक्षित केले.