Spread the love

शिरोळ : प्रतिनिधी : शिरोळ तालुका भारतीय जनता पार्टीच्या अध्यक्षपदी मुकुंद उर्फ बाळासाहेब गावडे यांची निवड करण्यात आली आहे भारतीय जनता पार्टी कोल्हापूर जिल्हा ग्रामीण पूर्वचे अध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर यांनी गावडे यांची निवड केली आहे

शिरोळ ग्रामपंचायतीचे माजी सदस्य मुकुंद उर्फ बाळासाहेब गावडे यांनी यापूर्वी भाजपाचे तालुका अध्यक्ष म्हणून उल्लेखनीय काम केले होते तसेच नेहमीच ते पक्ष वाढीसाठी प्रयत्नशील होते त्यांनी केलेल्या कामाची दखल घेत भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या मान्यतेने पुन्हा एकदा शिरोळ तालुका अध्यक्षपदी काम करण्याची संधी मुकुंद उर्फ बाळासाहेब गावडे यांना देण्यात आली आहे भाजपा जिल्हा ग्रामीण पूर्वचे अध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर यांनी मुकुंद गावडे यांना नियुक्तीचे पत्र दिले आहे

भारतीय जनता पार्टीतील वरिष्ठ नेते मंडळींनी दाखवलेल्या विश्वासात पात्र राहून पक्ष वाढीबरोबरच शासनाच्या योजनेचा लाभ जनतेला मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू असे आश्वासन नूतन तालुका अध्यक्ष मुकुंद उर्फ बाळासाहेब गावडे यांनी बोलताना दिले