Spread the love

जयसिंगपूर-
शिरोळ तालुक्यासह सर्वच ठिकाणी नदी काठावरील मळी भागात अथवा मळ्यातील वस्त्यांवर लोड शेडिंग मुळे सिंगल फेज होण्याचे प्रमाण वाढले होते, यामुळे वस्त्यांवर असलेल्या घराघरात रात्री अपरात्री वीज जाण्याचे प्रमाण वाढले होते, याचा फटका ज्येष्ठ नागरिक, शेतकरी,महिला भगिनी व शालेय विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात होत होता, या लोड शेडिंगबाबत अनेक भागातून तक्रारी येत होत्या,या संदर्भात महावितरण कोल्हापूर विभागाचे अधीक्षक अभियंता श्री. कावळे यांच्याशी व महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी आपण सातत्याने संपर्कात होतो, कोल्हापूर जिल्हा हा महावितरण कंपनीला सर्वाधिक उत्पन्न देणारा परिसर आहे,या भागात महावितरणच्या थकबाकीचे प्रमाण देखील अत्यल्प आहे त्यामुळे या भागातील ग्राहक व शेतकऱ्यांच्या शेती पंपाना नियमित वीज पुरवठा करावा अशा सूचना दिल्या होत्या,तांत्रिक अडचणी, महावितरण कडील जनरेटर रिपेरीची सुरू असलेली कामे, धरणे पूर्ण क्षमतेने भरली नसल्यामुळे वीज निर्मिती वर झालेला परिणाम, पावसाने ओढ दिल्यामुळे शिरोळ हातकणंगले तालुक्यात वाढलेली विजेची मागणी यामुळे लोड शेडिंग चा प्रश्न निर्माण झाला होता, परंतु बुधवारपासून सिंगल फेज लोड शेडिंग बंद झाले असल्यामुळे किमान वाड्या वस्त्यांवर व मळा भागांमध्ये घरगुती वापराच्या विजे मध्ये कपात होणार नाही अशी माहिती आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिली, दुरुस्तीसाठी घेतलेल्या जनरेटर मधील काही जनरेटर दुरुस्त होऊन कार्यान्वित झाली आहेत,महावितरण इतर खाजगी कंपन्यांकडून वीज खरेदी करण्यासाठी प्रयत्नशील आहे, त्यामुळे घरगुती बरोबरच शेतकऱ्यांच्या शेती पंपांना देखील लवकरच सुरळीत वीजपुरवठा केला जाईल असे महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी निर्माण झालेल्या या संकटाविषयी बोलताना सांगितले आहे, लवकरच या सर्व बाबींचे निराकरण करू असेही महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यानी सांगितले असल्याची माहिती आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिली आहे.