शिरोळ / प्रतिनिधी
दिनांक 29 ऑगस्ट 2023 रोजी वितरण करण्यात आलेल्या मेजर ध्यानचंद महाराष्ट्र क्रीडा रत्न पुरस्कार 2023 हा पुरस्कार शिरोळ गावचे सुपुत्र आणि आंतरराष्ट्रीय स्केटिंग प्रशिक्षक तेजस पाटील यांना जाहीर झाला.हा पुरस्कार सिने अभिनेत्री दिपाली सय्यद, सुप्रीम कोर्टाचे वकील सुरेंद्र कालीरमण , हिंदकेसरी पैलवान संतोष वेताळ , जागतिक चॅम्पियन पैलवान विलास देशमुख यांच्या हस्ते, तेजस पाटील यांना वितरण करण्यात आला.
तेजस पाटील यांनी आजवर शिरोळ तालुक्यात हजारो विद्यार्थ्यांना ट्रेनिंग दिलेले आहे. त्यामध्ये दोनशे पेक्षा जास्त खेळाडू राज्य पातळीवर आणि 70 पेक्षा जास्त खेळाडू राष्ट्रीय पातळीवर चमकले आहेत. तसेच गेल्या महिन्यात झालेल्या थायलंड येथे आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये त्यांचे दोन विद्यार्थी सुवर्णपदक मिळवलेले आहे आहेत . या सगळ्या कार्याचा आढावा घेऊन व दिल्लीमध्ये असणाऱ्या कलिरमान फाउंडेशनने याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार जाहीर केला. या सर्व यशामागे त्याचे श्रेय गोकुळचे माजी चेअरमन स्वर्गीय दिलीपराव दादा पाटील आणि त्यांचे आई वडील यांचे आहे.