Spread the love


मुंबई,22 ऑगस्ट
सध्या जगाचे लक्ष्य हे भारताच्या चांद्रयान-3 मोहिमेकडे लागले आहे. भारताने चंद्र मोहिमेची घोषणा केल्यानंतर रशियानेही लुना 25 चंद्रावर पाठवले होते. मात्र, रशियाच्या लुना 25 अपघातग्रस्त झाल्यानंतर ही मोहिम बंद करण्यात आली होती. त्यानंतर आता आणखी एका देशाने चांद्रमोहिम हाती घेतली आहे. 26 ऑॅगस्ट रोजी या देशाच्या यानाचे प्रक्षेपण होणार आहे.
जपानने देखील चंद्रावर यान पाठवण्याची घोषणा केली आहे. जापानी एयरोस्पेस एक्सप्लोरेशन एजेंसी ने दिलेल्या माहितीनुसार सकाळी 9.24 मिनिटांनी स्मार्ट लँडर चे प्रक्षेपण केले जाणार आहे. या मून लँडरला एच-2ए रॉकेटच्या माध्यमातून लाँच केले जाणार आहे. तानेगाशिमा या स्पेस सेंटरच्या योशिनोबू कॉम्प्लेक्समधून प्रक्षेपण केले जाणार आहे.
स्मार्ट लँडर म्हणजेच एथ्घ्श् हे नावाप्रमाणेच लहान आकाराची चंद्र मोहिम आहे. पण तरीही या मोहिमेकडून जपानला मोठ्या महत्वाकांक्षा आहेत. लँडरचा मुख्य उद्देश म्हणजे चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिग हे आहे. हेच जास्त आव्हानात्मक असणार आहे. जपानचे स्मार्ट लँडर 7.9 फूट (2.4 मीटर) उंच, 8.8 फूट (2.7) रुंद आणि 5.6 फूट (1.7 मीटर) खोल आहे.
डङखच या लँडरचे लक्ष्य हे चंद्राच्या पृष्ठभागावर 328 फूट (100 मीटर) खोलीपर्यंत पोहोचणे हे आहे. जपानचे मिशन हे चंद्राच्या शिओली क्रेटर या भागाचे परीक्षण करणे आहे. हे चंद्राच्या पृष्ठभागावरील चरीश छशलींरीळी येथील 984-फूट-रुंद खुले क्षेत्र आहे. हा प्रदेश चंद्राच्या 13 अंश दक्षिण अक्षांश आणि 25 अंश पूर्व रेखांशावर स्थित आहे. 2009 मध्ये प्रक्षेपित केलेल्या जपानच्या सेलेन ऑॅर्बिटरच्या निरीक्षणात्मक डेटाच्या मदतीने साइट शोधण्यात आली. जपानी एरोस्पेस एक्सप्लोरेशन एजन्सीच्या म्हणण्यानुसार, यानाची सॉफ्ट लँडिंग महत्त्वाची आहे.
चांद्रयान- 3 अंतिम टप्प्यात
चांद्रयान- 3 मोहिम आता सगळ्यात महत्त्वाच्या टप्प्यात आहे. सध्या चांद्रयान चंद्राच्या पृष्ठभागापासून 20 मीटर दूर आहे. अवघ्या काही तासांतच ते चंद्रावर उतरणार आहे. इस्रोने त्याचे थेट प्रक्षेपण भारतीय प्रमाणवेळेनुसार बुधवारी सायंकाळी 5 वाजून 20 मिनिटांनी सुरु होणार असल्याचं सांगितलं आहे. यावेळी इस्रोकडून ङरपवशी झेीळींळेप ऊशींशलींळेप उराशीर (ङझऊउ)तून टीपण्यात आलेली चंद्राची काही छायाचित्रसुद्धा शेअर केली. या कॅमेरामुळे लँडरला चंद्राच्या पृष्ठावर उतरण्यास मोठी मदत होणार आहे.