Spread the love

जयसिंगपूर- दि.२२

सुळकुड पाणी योजना शिरोळ तालुक्याच्या मुळावर उठणारी आहे, या योजनेमुळे शिरोळ तालुक्यातील जवळपास दहा गावांना मोठा फटका बसणार असल्यामुळे सुळकुड योजनेला आपला कायमचा आणि टोकाचा विरोध राहील असा इशारा माजी आरोग्य राज्यमंत्री आणि शिरोळचे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे,

इचलकरंजी शहराला पाणीपुरवठा सध्या शिरोळ तालुक्यातील कृष्णा पंचगंगा नदीच्या संगमावरूनच होतो, या ठिकाणाहून मुबलक प्रमाणात पाणी उपसा करता येतो असे असताना केवळ निकृष्ट पाणी योजना केली असल्यामुळे ही जलवाहिनी ज्या मार्गावरून जाते त्या मार्गावरील शेतकरी व नागरिकांना गेली अनेक वर्षे मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे, या योजनेबरोबरच इचलकरंजी शहरासाठी शहरालगत असलेल्या पंचगंगा नदी पात्रातून सुद्धा पाणी योजना अस्तित्वात आहे, या दोन्ही योजना सक्षम केल्या आणि पंचगंगा शुद्धीकरणाची मानसिकता ठेवली तर इचलकरंजी शहराला पाणी कमी पडणार नाही, असे असताना  दुसरी कडून पाण्याची त्यांची अपेक्षा वाढत आहे, पण केवळ पाण्याचे राजकारण करण्यासाठी इचलकरंजीची नेते मंडळी सुळकुड योजनेची मागणी लावून धरत आहेत, व तालुक्या तालुक्यांमध्ये संघर्ष निर्माण करीत आहेत ही बाब चुकीची आणि दुर्दैवी आहे, सुळकुड योजना अस्तित्वात आली तर शिरोळ तालुक्यातील घोसरवाड, दत्तवाड, नवे दानवाड, जुने दानवाड, टाकळीवाडी, टाकळी, हेरवाड, अब्दुललाट, शिरदवाड, व शिवनाकवाडी या गावांना मोठा फटका बसणार असून शेती बरोबरच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होणार आहे, गत उन्हाळ्यात अगदी जानेवारी ते मे महिन्यापर्यंत दूधगंगा काठावरील या गावांना मोठ्या पाणीटंचाईला  सामोरे जावे लागले, शेतीपंप बंद होते, शिरोळ तालुका हा हरितक्रांती असलेला तालुका म्हणून ओळखला जातो, तालुक्यात उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे यामध्ये वरील सर्व गावांमध्ये देखील उसासह बागायती शेती मोठ्या प्रमाणात केली जाते, काळमवाडी प्रकल्पामधून दूध गंगेमध्ये येणारे पाणी सर्वप्रथम कर्नाटक हद्दीत जाते आणि तेथील पाच बंधारे ओलांडून ते शिरोळ तालुक्यातील दत्तवाड बंधाऱ्याला पोहोचते, उन्हाळ्यात कर्नाटक आपल्या बंधाऱ्यातून पाणी सोडत नाही त्यामुळे शिरोळ तालुक्यातील दूधगंगेचे पात्र कोरडे होते, याचाच परिणाम म्हणून दूधगंगा काठावरील शिरोळ तालुक्यातील ऊस पिकासह सर्व प्रकारच्या पिकांचे मोठे नुकसान झाले व शिरोळ तालुक्यातील या नदीकाठावरील शेतकरी आर्थिक संकटात सापडला,  पिण्याच्या पाण्यासाठीच्या या सर्व गावांमधील पाणीपुरवठा योजना पूर्णपणे बंद होत्या, या सर्व गावांना टॅंकरने पाणीपुरवठा करावा लागला, या परिसरातील नागरिकांनी पिण्याच्या पाण्यासाठी प्रसंगी नदी पात्रात बोर मारले इतकी वाईट परिस्थिती निर्माण झाली होती, यावर्षी पावसाचे प्रमाण कमी आहे, त्यामुळे या नदीकाठावरील लोकांना पुन्हा गंभीर पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार आहे, सुळकुड योजना अस्तित्वात नाही तरी ही अवस्था या नदीकाठावरील लोकांची होत आहे, ही योजना झाली आणि इचलकरंजी शहरासाठी मोठ्या प्रमाणात पाणी उपसा होऊ लागला तर शिरोळ तालुक्यातील जनतेला केवळ उन्हाळा नव्हे बारा महिने पाणीटंचाईला सामोरे जावे लागेल हे वास्तव आहे, त्यामुळे आम्ही सुळकुड योजना होऊ देणार नाही आणि यासाठी आमचा टोकाचा विरोध राहील असेही आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी म्हंटले आहे, सुळकुड योजनेची घोषणा होताच वरील सर्व गावांमधील लोकप्रतिनिधींनी आपापल्या गावातील व्यवहार बंद ठेवून लाक्षणिक उपोषण करत सुळकुड योजनेला विरोध केला आहे, बबन चौगुले, सरपंच चंद्रकांत कांबळे, नूर काले, राजू पाटील, सुरेश पाटील, संजय पाटील दतवाड, डॉ. सी. डी. पाटील सरपंच नवे दानवाड, प्रवीण पाटील सरपंच जुने दानवाड, अर्जुन जाधव सरपंच हेरवाड, स्वप्नील सांगावे अब्दुललाट, महादेव कोळी शिरदवाड, सतीश बरगाले शिवनाकवाडी, भरत पाटील टाकळीवाडी, रणजीत पाटील टाकळी यांच्यासह या परिसरातील शेकडो लोकप्रतिनिधी शेतकरी व नागरिकांनी सहभाग होऊन निषेध व्यक्त केला आहे, लवकरच या सुळकुड योजनेला विरोध म्हणून शिरोळ तालुक्याच्या वतीने मोठ्या मोर्चाचे आयोजन केले जाणार असल्याचेही आमदार राजेंद्र पाटील यांनी शेवटी म्हंटले आहे.