मुंबई,20 ऑगस्ट
रशियाच्या अंतराळ संशोधन संस्था रोस्कॉसमॉसने रशियाची चांद्रमोहिम अपयशी ठरल्याची अधिकृत बातमी दिली आहे. अनियंत्रित कक्षेत फिरल्यानंतर रशियाचे लुना 25 अंतराळ यान चंद्रावर कोसळले आहे. रशियाचं लुना 25 अंतराळयान 21 ऑॅगस्ट रोजी चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करण्याचा प्रयत्न करणार होतं, परंतु त्यापूर्वीच तांत्रिक समस्या उद्भवल्याने ते चंद्राच्या पृष्ठभागावर क्रॅश झालं. गेल्या 50 वर्षांत पहिल्यांदाच अशा पद्धतीचे मिशन करणाèया रशियासाठी ही खूप धक्कादायक बाब आहे.
रशियन अंतराळ संशोधन संस्था रोस्कॉसमॉसने अधिकृतरित्या सांगितले आहे की, अनियंत्रित कक्षेत फिरल्यानंतर रशियाचे लुना 25 अंतराळ यान चंद्रावर कोसळले आहे. रोस्कोसमॉसने सांगितले की, लुना 25 ला प्री-लँडिंग ऑॅर्बिटमध्ये असताना शंटिंग करण्यात तांत्रिक समस्या उद्भवली होती. यानंतर पुन्हा प्रयत्न करताना लूनाचे लँडर चंद्राच्या अनियोजित कक्षेत पोहोचले. यानंतर लँडरचा ताबा सुटला आणि ते चंद्रावर क्रॅश झाले.
रोस्कॉसमॉस मधील वैज्ञानिक सातत्याने लँडरचा शोध घेण्याचा आणि त्याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होते. मात्र या प्रयत्नांना यश मिळालं नाही. अखेर ही मोहीम अयशस्वी झाल्याचं रॉस्कॉस्मॉसने आपल्या अधिकृत टेलिग्राम चॅनलवरून स्पष्ट केलं. रोस्कोसमॉसने एका निवेदनात म्हटलं आहे की, ङ्खलुना 25 नियोजित कक्षेत न जाता वेगळ्या अनियंत्रित कक्षेत गेले आणि त्याची चंद्राच्या पृष्ठभागाशी टक्कर झाली. यामुळे ही मोहिम अयशस्वी ठरली.’’
47 वर्षांनंतर प्रयत्न
1976 साली पार पडलेल्या लूना 24 या मोहीमेनंतर तब्बल 47 वर्षांनी रशियाने ही चांद्रमोहीम राबवली होती. यामुळेच लूना 25 कडून रशियाला मोठ्या आशा होत्या. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पाण्याचं अस्तित्व शोधून, त्याठिकाणी पुढील एक वर्षांपर्यंत संशोधन करण्याच्या उद्देश्याने लूना 25 चं प्रक्षेपण करण्यात आले होते. यानाच्या हलक्या वजनाच्या डिझाईन आणि इंधन साठवणुकीच्या क्षमतेमुळे कमी वेळेत हे यान चंद्राच्या कक्षात पोहचले होते. मात्र, चंद्र मोहिम पूर्ण होण्याच्या आधीच हे अंतराळयान क्रॅश झाले.
भारताच्या मोहिमेकडे अवघ्या जगाचं लक्षष्ठ
भारताचे चांद्रयान 3 ही चंद्राच्या अतिशय जवळ पोहोचले आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोने शुक्रवारी सांगितले होते की चांद्रयान 3 ने लँडर मॉड्यूलला चंद्राच्या जवळ जाणारी डिबूस्टिंग प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केली असून याची स्थिती सामान्य आहे. हे यान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर 23 ऑॅगस्टला सॉफ्ट लँडिंग करण्याची आशा आहे. रशिया आणि भारत दोन्ही देश दोन दिवसांच्या अंतराने चंद्रावर उतरणार होते. आता रशियाचे लुना 25 क्रॅश झाल्यानंतर जगाचे लक्ष भारताच्या चंद्र मोहिमेकडे लागले आहे.