श्री स्वामी समर्थ सायकल शोरूम आजपासून शिरोळकरांच्या सेवेत दाखल
आज सकाळी साडे दहाच्या दरम्यान रत्नागिरी जिल्ह्याचे डीवायएसपी राजेंद्र हिंदुराव राजमाने यांच्या हस्ते फित कापून श्री स्वामी समर्थ सायकल शोरूमचा भव्य शुभारंभ करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री दत्त साखर कारखान्याचे चेअरमन गणपतराव पाटील हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी उपस्थिती लावली होती.
श्री स्वामी समर्थ सायकल शोरूमच्या माध्यमातून सायकलमधील 30 पेक्षा जास्त ब्रॅण्ड उपलब्ध करून देण्यात आले आहे. एकदा सायकल चार्जिंग केल्यानंतर 40 ते 45 किलोमीटर जाते. व पुन्हा दोन किलोमीटर सायकल पायडेंलच्या माध्यमातून चालवल्यानंतर चार्जिंग होवून पुन्हा दहा किलोमीटर सायकल जाते. लहान मुलांपासून ते मोठ्या थोरांपर्यंत आणि ट्रॅकिंगप्रेमींना साथ देण्यापर्यंत सायकल उपलब्ध करून देण्यात आली आहे. श्री स्वामी समर्थ सायकल शोरूमच्यावतीने शिरोळमधील आयुष्यभर सायकल माझी सोबती अशी विचारधारा जोपासणार्या शिरोळमधील सामाजिक कार्यकर्ते खंडेराव हेरवाडे, शिवाजीराव संकपाळ, सुनिल कदम, आरती विजय कोळी, व पिग्मी एजंट महादेव माने यांचा सत्कार हातकणंगले मतदार संघाचे नेते अशोकराव माने बापू यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी खासदार राजू शेट्टी, प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्ष अमरसिंह माने पाटील, नगरसेवक तातोबा पाटील, गोडी विहीरचे अध्यक्ष संभाजी भोसले, इसुफ पेट्रोलियमचे हैदर मेस्त्री, कॉन्ट्रॅक्टर सुनिल माने, भरत बँकेचे चेअरमन पै. विठ्ठल मोरे, गुरूदत्त शुगर्सचे संचालक शिवाजी सांगले, दरगू गावडे, धनाजी पाटील नरंदेकर, चंद्रशेखर पाटील बारवाडकर आदींनी उद्योजक गोरखनाथ माने व व्यवस्थापक मुकुंद माने यांना शुभेच्छा दिल्या.v