Spread the love


कोल्हापूर,9 जून (पीएसआय)
कोणत्याही व्यवसायात 14 वर्षाखालील बालक काम करताना अढळल्यास अथवा धोकादायक उद्योग व प्रक्रिया करणाèया संस्थामध्ये 18 वर्षाखालील किशोरवयीन कामगार कामावर ठेवल्याचे निदर्शनास आल्यास सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन सहाय्यक कामगार आयुक्त वि.वि. घोडके यांनी केले आहे.
जिल्ह्यातील सर्व आस्थापना, दुकाने, कारखाने व अन्य व्यावसायिकांनी बाल व किशोरवयीन कामगार (प्रतिबंध व नियमन) अधिनियम, 2016 नुसार 14 वर्षाखालील बालकांना कामावर ठेवणे तसेच 14 ते 18 वयोगटातील किशोरवयीन मुलांना धोकादायक उद्योग व प्रक्रियामध्ये कामावर ठेवणे हा गुन्हा आहे. मालकाने, नियोक्त्याने बालक अथवा किशोरवयीन मुलास कामावर ठेवल्यास त्यांना 20 हजार ते 50 हजार रुपयांपर्यंत दंड अथवा 6 महिने ते 2 वर्षांपर्यंत कारावास होवू शकतो किंवा दोन्हीही शिक्षा होवू शकतात, असेही श्री. घोडके यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.