नागपूर,9 जून
भाजप नेते आमदार नितेश राणे दोन दिवसीय अमरावती दौèयावर आहेत. शरद पवार यांच्याशी आमचे विचार पटत नसले तरी त्यांना काहीही त्रास होणार नाही, एवढी काळजी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस घेतील. शेवटी हे उद्धव ठाकरेचे सरकार नाही. महाविकास आघाडीचे सरकार नाही. जेव्हा महाविकास आघाडीचे सरकार होते, तेव्हा भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांची सुरक्षा कमी करण्यात आली होती, त्यांना थ्रेट असला तरी सिक्युरिटी काढली होती. तशा गोष्टी आम्ही करणार नाही.
धमकीची गरज नाही : आता मच्छर मारण्यासाठी कोणाला धमकी देण्याची गरज नाही ना. पायाचा बूट हलवला तरी मच्छर मरतो. त्याला धमकी वगैरे काही चालत नाही. दुसरे सुनील राऊत आहे. त्यांना धमकी कोणाकडून आली, हे विचारा, कारण मी ऐकले आहे की मुंबईतील एक डॉ. महिला यांच्यामागे पडली आहे. कारण संजय राऊत हे उथसुठ तिला धमकी द्यायचे. त्या डॉक्टर महिलेकडून तर संजय राऊत यांना धमकी नाही ना? याचे उत्तर संजय राऊत यांनी द्यावे, असे म्हणत त्यांनी राऊतांवर निशाणा साधला.
नाक्यावर बसून चर्चा : 2024 ला महाविकस आघाडीचे सरकार येईल तेव्हा भाजप नेत्यांची यादी तयार करा, ज्यांच्या मागे ईडी लावायची आहे, असे वक्तव्य संजय राऊत यांनी केले आहे. यावर बोलताना नितेश राणे म्हणाले की, संजय राऊत आणि विनायक राऊत हे घरात बसून चर्चा करत होते का?? कारण 2024 ला विनायक राऊत खासदार नसणार आणि संजय राऊत बाहेर नसणार. मग सत्ता कुठून येणार? नाक्यावर बसून चर्चा करू नये.