हुपरी -वार्ताहर
हुपरी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये बेकायदेशीर दारू विक्री करण्याचा व्यवसाय चालू असलेला पोलिसांना अंदाज लागल्यानंतर त्यांनी छापे टाकून बेकायदेशीर दारू जप्त केली आहे त्यामध्ये फिर्यादीच्या नोंदीवरून 1)आरोपी मुकेश रंजन सिंग मलके वय 40 राहणार हलसवडे. तो भोजकर मळा तळंदगे या ठिकाणी बेकायदेशीर दारू विकत असताना आढळून आला त्याच्या जवळून देशी दारू जीएम डॉक्टर देशी दारू टॅंगो पंच गावटी हातभट्टी असा एकूण 1305 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला त्याचप्रमाणे 2) निर्मला बबलू मलके .वय वर्ष-50 राहणार भोजकर मळा तळंदगे. राहत्या घरा जवळ असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये बेकायदेशीर दारू विकत असताना त्यांना पकडण्यात आले त्यांच्याकडून 3000/ रुपये चा मुध्येमाल जप्त करण्यात आला आहे.3) समीर सैपन पिरजादे वय 26 वर्ष राहणार शाहूनगर चंदुर हा लंगोटी मळा या ठिकाणी दारु विक्री करत असलेला पोलिसांना आढळून आला त्याच्याकडून देशी दारू जीएम डॉक्टर. देशी दारू टॅंगो पंच. हातभट्टी दारू असा एकूण 3436 रुपये मुद्देमाल जप्त करण्यात आला या सर्व आरोपींना पोलिसांनी आपल खाकी हिस्का दाखवुन त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे या तिघांनाही अटक करण्यात आलेले असून हुपरी पोलीस स्टेशनचे पोलीस नाईक पोटकुले अधिक तपास करीत आहे