Spread the love

पहिल्या दहामध्ये एकाही विद्यापीठाचा समावेश नाही


मुंबई,5 जून
आज केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडून नॅशनल इन्स्टिट्यूट रँकिंग फ्रेमवर्क 2023 म्हणजेच, देशभरातील शैक्षणिक संस्था, विद्यापीठांचं रँकिंग जारी करण्यात आलं आहे. या यादीत निराशाजनक बाब म्हणजे, देशातील सर्वोत्तम टॉप 10 विद्यापीठांच्या यादीत महाराष्ट्रातील एकाही विद्यापीठाला स्थान मिळालेलं नाही.
मुंबई आयआयटीनं देशातील इंजिनिअरिंग शिक्षण संस्थांच्या यादीत तिसरा क्रमांक मिळवला आहे, तर रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये देशातील शैक्षणिक संस्थांमध्ये मुंबई आयआयटी चौथ्या क्रमांकावर आहे. तर इनोव्हेशनच्या बाबतीत देशात मुंबई आयआयटीचा सातवा क्रमांक आहे. तर देशातील दंत महाविद्यालयांच्या यादीमध्ये पुण्याच्या डी.वाय. पाटील विद्यापीठ तिसèया क्रमांकावर आहे.
विद्येचे माहेरघर पुण्यातून मुंबईकडे शिफ्ट?
टॉप विद्यापीठांच्या यादीत टॉप 10 मध्ये महाराष्ट्रातील एकाही विद्यालयाचा समावेश नाही. सावित्रीबाई फुले, पुणे विद्यापीठ हे या यादीत 19व्या क्रमांकावर आहे. तर मुंबईतील इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी 23व्या क्रमांकावर आहे. तसेच, पुण्यातील सिम्बायोसिस इंटरनॅशनल हे या यादीत 32व्या क्रमांकावर आहे.
विद्यापीठ स्कोअर क्रमांक
सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे 58.19 19
इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी 57.07 23
सिम्बायोसिस इंटरनॅशनल (पुणे, महाराष्ट्र) 53.13 32
दत्ता मेघे इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन अ‍ॅन्ड रिसर्च 51.92 39
डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ, पुणे 50.62 46
नरसी मोनजी इन्स्टिट्यूट मॅनेजमेंट, मुंबई 50.31 47
मुंबई विद्यापीठ, मुंबई 48.63 56
भारती विद्यापीठ, पुणे 43.61 91
टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स, मुंबई 43.08 98
महाविद्यालये
फर्ग्युसन (स्वायत्त) महाविद्यालय पुणे 53.88 79
शासकीय विज्ञान संस्था नागपूर 53.54 83
निर्मला निकेतन सामाजिक कार्य महाविद्यालय 55.18 57
व्यवस्थापनशास्त्र
राष्ट्रीय औद्योगिक अभियांत्रिकी इन्स्टिट्यूट, मुंबई 71.997 7
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बॉम्बे 68.11 10
सिम्बायोसिस इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट 62.74 20
एसवीकेएम नरसी मोनजी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज 60.84 21
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट 53.41 43
के. जे. सोमय्या इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अ‍ॅन्ड रिसर्च 52. 14 45
एल एन वेलिंगकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट डेव्हलपमेंट अ‍ॅन्ड रिसर्च 48.21 73
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ बँक मॅनेजमेंट 47.08 76
संशोधन संस्था
टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च मुंबई 62.66 10
होमी भाभा नॅशनल इन्स्टिट्यूट मुंबई 58.88 15
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अ‍ॅण्ड रिचर्स पुणे 52.22 27
इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नोलॉजी मुंबई 48.82 37