मुंबई,5 जून
शेतकèयांसाठी आनंदाची बातमी आहे. मान्सून लवकरच राज्यात दाखल होणार आहे. मान्सूनबाबत हवामान विभागानं नवा अंदाज वर्तवला आहे. येत्या 11 जूनपर्यंत मान्सून राज्यात दाखल होणार असल्याची शक्यता , भारतीय हवामान विभागाचे वैज्ञानिक सुनिल कांबळे यांनी वर्तवली आहे. केरळमध्ये येत्या दोन ते तीन दिवसांत मान्सून सेट होईल, त्यानंतर मुंबईत आकारा तारखेच्या जवळपास मान्सून दाखल होऊ शकतो असे सुनिल कांबळे यांनी म्हटले आहे.
हवामान विभागाचा नवा अंदाज
येत्या दोन ते तीन दिवसांत केरळमध्ये मान्सून सेट होईल, त्यानंतर मुंबईत आकारा तारखेच्या जवळपास मान्सून दाखल होऊ शकतो. यंदा 96 ते 104 टक्क्यांच्या दरम्यान पाऊस पडले त्यांनी यावर्षी सामान्य मान्सून बघायला मिळेल. अरबी समुद्रात उद्यापासून वादळे तयार होणार आहेत. ते साधारण 14-15 तारखेच्या सुमारास पुर्ण तयार होतीले. त्यामुळे मुंबई आणि कोकण किनारपट्टीवर पाऊस पडेल असे सुनिल कांबळे यांनी म्हटले आहे.
दरम्यान येत्या आठवड्यात तापमानात नॉर्मलपेक्षा 1-2 डिग्रीची वाढ होऊ शकते. त्यामुळे उना जास्त जाणवेल. साधारणपणे या महिन्यात उष्णता एक डिग्रीने जास्तच राहणार असल्याची माहिती देखील हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.
पंजाबराव डख यांचा अंदाज
दरम्यान दुसरीकडे येत्या आठ जूनला राज्यात मान्सून दाखल होईल असा अंदाज हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांनी व्यक्त केला आहे. मान्सूनचा पाऊस पूर्वेकडून येणार असल्यामुळे तो वेळेत म्हणजे आठ जूनलाच राज्यात सक्रिय होईल. 12 ते 17 तारखेपर्यंत त्याची तीव्रता वाढेल तर वीस तारखेपर्यंत मान्सून राज्यभर सक्रिय होईल असा अंदाज डख यांनी व्यक्त केला आहे.