Spread the love

तारदाळ वार्ताहर / बसगोंडा कडेमणी


हातकणंगले तालुक्यातील तारदाळ ग्रामपंचायत यांच्या वतीने पर्यावरण दिनाचे औचित्य साधत सन्मती विद्यालयाच्या पाठीमागे असणाऱ्या क्रिकेट मैदान च्या सभोवताली सरपंच सौ.पल्लवी पवार यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
दरवर्षी पाच जून हा दिवस पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो. पर्यावरणाची गुणवत्ता वाढवणे समस्या व संवर्धनाविषयी जागरूकता निर्माण करणे आणि पर्यावरण विषयक निर्णय घेण्याची क्षमता निर्माण व्हावी म्हणून पोषक वातावरणाचे निर्मिती करणे हा पर्यावरण दिन साजरा करण्यामागचा हेतू असल्याने याच अनुषंगाने तारदाळ ग्रामपंचायत यांच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी ग्रामविकास अधिकारी बाबासाहेब कापसे, रणजीत पवार, सुरेश पवार ,भाऊसो चौगुले, विनायक वडर, अजित वाडेकर ,सुरेश कोळी, दत्तात्रय शिंदे आदी उपस्थित होते.