Spread the love

शिरोळ प्रतिनिधी : येथील इलेक्ट्रिकल इंजिनियर व आदर्श युवा उद्योजक अभिजीत दिलीपराव माने यांना महाराष्ट्र जर्नालिस्ट फाउंडेशन या नामांकित पत्रकार संस्थेकडून राष्ट्रीय भास्कर अवॉर्ड प्रदान करण्यात आला. गोवा येथील रवींद्र भवन साखळी येथे मान्यवरांच्या उपस्थितीत दि प्राइड ऑफ इंडिया भास्कर अवॉर्ड हा शानदार पुरस्कार वितरण सोहळा झाला. साहित्यिक पद्मश्री विनायक खेडेकर कार्यक्रमाच्या अध्यक्षांनी होते.

पिताश्री तथा तंटामुक्ती समितीचे माजी अध्यक्ष दिलीपराव माने यांचे भक्कम पाठबळ असून, शिरोळ – दत्त साखर कारखान्याचे चेअरमन मा.श्री गणपतराव पाटील (दादा) व शिरोळमधील प्रसिद्ध सिव्हिल इंजिनिअर मा.श्री रामप्रसाद पाटील साहेब यांनी आशीर्वादाबरोबरच त्यांना व्यावसायिक दृष्टीची दिशा दिली आहे. त्यामुळेच इलेक्ट्रिकल क्षेत्रात इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर ते एक आदर्श युवा उद्योजक म्हणून उभं राहण्याची संधी मिळाल्याचे अभिजीत माने यांनी सांगितले…

माजी केंद्रीय कायदा मंत्री ॲड. रमाकांत खलप यांच्या हस्ते इलेक्ट्रिकल इंजिनियर अभिजीत माने यांना कोल्हापुरी फेटा, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन भास्कर अवॉर्ड पुरस्काराने गौरविण्यात आले. या समारंभात इंजिनीयर माने यांच्यासह मान्यवरांनी मनोगत व्यक्त करून महाराष्ट्र जर्नालिस्ट फाउंडेशननेेे आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे कौतुक केले.
या समारंभास ॲड रणजितसिंह राणे ,अभिजीत पाटील ,राजीव लोहार यांच्यासह माजी सरपंच शिवाजीराव माने -देशमुख, तंटामुक्त समितीचे माजी अध्यक्ष दिलीपराव माने, सामाजिक कार्यकर्ते दगडू माने,संजय शिंदे, उदय संकपाळ -शिलेदार, रमेश पाटील, सचिन माने, सुरज मोरे ,पिंटू माळी, संदीप पाटील आदी उपस्थित होते.
दरम्यान, गव्हर्नमेंट इलेक्ट्रिकल इंजिनिअर अभिजीत माने यांनी नोकरीपेक्षा स्वतःचा व्यवसाय करायचा असा संकल्प करून त्यांनी सन 2013- 14 मध्ये इलेक्ट्रिकल इंजिनियर म्हणून शिक्षण पूर्ण केले. आपल्या ज्ञानाचा उपयोग व्यवसायिकतेबरोबरच सार्वजनिक जीवनात लोकोपयोगी झाला पाहिजे अशी भूमिका अभिजीत माने यांची होती. शैक्षणिक क्षेत्रात अत्यंत परिश्रम घेऊन 2014 साली इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर म्हणून त्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरु केला. व्यवसायातील स्पर्धा तसेच व्यवसाय सुरू करताना येणाऱ्या अडचणी त्यांनी आव्हान म्हणून स्वीकारलं. व्यवसायातील कौशल्य, गुणवत्ता, सौजन्यपूर्ण व्यवहारिक ज्ञान व प्रामाणिकपणा या बळावर श्री गुरुदत्त इलेक्ट्रिकल्स अँड इंजिनियर्स ही स्वतःची संस्था काढून त्यांनी 5 जिल्हयामध्ये गव्हर्नमेंट टेंडरच्या माध्यमातून गेल्या सात वर्षापासून इलेक्ट्रिकल क्षेत्रात त्यांचे प्रभावी कार्य आहे. नुकताच त्यांनी जिल्ह्यात पहिला सोलर हायमास्ट प्रोजेक्ट यशस्वी करून दाखवला आहे. इंजिनीयर माने यांनी दोन वर्षांपूर्वी शिरोळमध्ये इलेक्ट्रिकल स्ट्रीट लाईट पोल मॅन्युफॅक्चरिंग फॅक्टरी काढली असून या फॅक्टरी च्या माध्यमातून 70 लोकांच्या हाताला रोजगार मिळाला आहे.आगामी काळात सुमारे 400 कुटुंबांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याचा मानस आहे.त्या दृष्टीने त्यांची वाटचाल सुरू आहे.