Spread the love

कोल्हापूर,20 मे
वाढत्या दुचाकीस्वारांच्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यात हेल्मेट सक्ती केली जाणार आहे. जिल्ह्यात सोमवारी 22 मेपासून हेल्मेट सक्ती लागू होणार आहे. तथापि, पहिल्या दिवसांपासून कोणतीही दंडात्मक कारवाई करण्यात येणार नाही. हेल्मेट वापरासाठी जनजागृती केली जाणार आहे.
प्रशासनाकडून पहिल्या आठ दिवसांमध्ये कोणत्याही प्रकारची कारवाई केली जाणार नाही. त्यानंतर मात्र हेल्मेट नसलेल्या दुचाकीस्वारांना 1000 रुपये करणार दंड करण्यात येणार आहे. दुचाकीस्वार ज्या संस्थेत, कार्यालयात, कंपनीत काम करतो त्या मालकासही होणार 1000 रुपये दंड करण्यात येणार असल्याची माहिती कोल्हापूर प्रादेशिक परिवहन अधिकारी दीपक पाटील यांनी दिली आहे. मोटार वाहन कायदा, 1988 मधील कलम 194 ड मधील तरतुदीनुसार हेल्मेट वापरासंबंधी तरतुदींचा भंग करणाèया अथवा त्यास संमती देणाèया व्यक्तीस दंडाची तरतूद आहे.
दीपक पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार दुचाकी चालवणाèयांना व मागे बसणाèयास सुद्धा कायद्याने हेल्मेट सक्ती आहे. मोटर वाहन कायद्यामध्ये केलेल्या सुधारणेनुसार हेमेल्ट न घालता गाडी चालवणाèयाला 1 हजार रुपये दंडाची तरतूद आहे, तर मागे बसणाèयालाही तेवढ्याच दंडाची तरतूद आहे. तसेच ज्या आस्थापना आहेत किंवा त्यांचे कार्यालय प्रमुख आहेत त्यांनाही 1 हजार रुपये दंडाची तरतूद आहे. पहिल्या टप्प्यात सरकारी आणि खासगी आस्थापना आणि महाविद्यालये असे तीन विभाग घेतले आहेत. या सर्वांना नोटीस पाठवल्या गेल्या आहेत. येत्या 5 ते 7 दिवसात जिल्ह्यातील सर्वच मोठ्या आस्थापनांना नोटीस पाठवण्यात येणार आहेत.
जिल्ह्यात दुचाकीस्वारांच्या अपघाताचे प्रमाण सर्वाधिक
कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या वर्षभरात एकूण रस्ते अपघातामध्ये 70 ते 80 टक्के अपघात दुचाकी व पादचाèयांचे आहेत. रस्ते सुरक्षेच्या दृष्टीकोनातून ही अतिशय चिंताजनक बाब आहे. वाहन चालविताना हेल्मेटचा वापर करणे हे रस्ता सुरक्षेच्या दृष्टीकोनातून अत्यंत महत्वाचे आहे. बहुतांशी दुचाकी वाहनाच्या अपघातांमध्ये जखमी अथवा मृत वाहनस्वार हे हेल्मेटशिवाय प्रवास करणारे आहेत. त्यामुळे हेल्मेटसाठी व्यापक मोहीम कोल्हापूर जिल्ह्यात राबविण्यात येत आहे.