Spread the love

नागपूर 20 मे
न्यायालयाच्या निकालानंतर राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. राज्यात लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूर दौèयावरुन तातडीने शुक्रवारी रात्री दिल्लीला रवाना झाले आहेत. त्यांची भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली असून मंत्रिमंडळाच्या विस्ताराला भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी हिरवा कंदील दाखवल्याची चर्चा सुरू आहे.
पाच तास मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा : सत्ता संघर्षाचा निकाल सत्ताधाèयांच्या बाजूने लागल्यानंतर आता मंत्रिमंडळ विस्ताराचा मार्ग मोकळा झाला आहे. भाजप नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोन दिवसांच्या नागपूर दौèयावर आले होते. मात्र शुक्रवारी रात्री अचानक दिल्लीला रवाना झाले. सुमारे पाच तास मंत्रिमंडळ संदर्भात पक्ष श्रेष्ठ सोबत चर्चा केल्यानंतर ते पहाटे नागपूरला परतले आहेत.
येत्या आठ दिवसात मंत्रिमंडळ विस्तार : सत्ता संघर्षाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात सुरू होती. त्यामुळे गेल्या 11 महिन्यांपासून रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार येत्या आठ दिवसात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भारतीय जनता पक्षासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील अनेक आमदार मंत्री पदाच्या शर्यतीत आहेत. त्यातील कुणाला संधी द्यावी यासंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पक्षश्रेष्ठीमध्ये सखोल चर्चा झाली आहे.
रात्री दिल्ली सकाळी नागपूर : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे रात्री सुमारे 9 वाजताच्या दरम्यान दिल्लीला रवाना झाले होते. दिल्लीत पक्षश्रेष्ठींसोबत मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा केल्यानंतर ते रात्री तीनच्या दरम्यान नागपूरला परत आले आहेत.
फडणवीस दोन दिवसीय नागपूर दौèयावर : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ज्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहे, त्या प्रत्येक मतदार संघांमध्ये जाऊन तालुक्याची आढावा बैठक घेत आहेत. शासकीय योजनांची संपूर्ण माहिती खालपर्यंत पोहोचली पाहिजे, त्यांना गती आली पाहिजे त्यासाठी हा आढावा घेत आहेत. या काळात त्यांनी नागपूर जिल्ह्यातील चार मतदार संघाचा आढावा घेतला असून आज देवेंद्र फडणवीस दोन मतदार संघाचा आढावा घेणार आहेत.