सरकारची हुकूमशाही, लाठीकाठी मारून विकास होत नाही - आदित्य ठाकरे
Spread the love

पुणे,6 मे
शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी आज पुण्यातील वेताळ टेकडी या ठिकाणी येऊन पाहणी केली. इथल्या सगळ्या समस्या जाणून केल्या आहेत. परंतु सरकार लाठी काठी मारून विकास करण्याचा प्रयत्न करत आहे.सरकारची ही हुकूमशाही आहे हुकूमशाहीने विकास करणे हे कुठल्याही लोकशाहीला शोभत नाही. आमच्याच लोकांना मारून जर तुम्ही विकास करत असाल तर लोकांच्या भावना समजून घेतल्या पाहिजेत. असे म्हणत जोरदार टीका त्यांनी राज्य सरकारवर केली आहे. पुण्यातील बालभारती ते एमआयटी कॉलेज या ठिकाणी होणारा अंडरग्राउंड रस्ता, हा वेताळ टेकडी फोडून करण्यात येणार आहे. त्यामुळे त्या सर्व विकासाला पर्यावरणवादाचा विरोध आहे हा विरोध महानगरपालिकेने ऐकला पाहिजे. एक माणूस जरी विरोध करत असेल. त्याची भूमिका योग्य असेल तर ते मान्य केले पाहिजे. असे सुद्धा आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले.
सरकारला लगावला टोला: पुण्यातील वेताळ टेकडीचा प्रश्न गेले अनेक दिवस प्रलंबित आहे. महानगरपालिका आणि पर्यावरणवादी यांच्यामध्ये हे संघर्ष चालू आहे. त्याची माहिती आज आदित्य ठाकरे यांनी घेतलेली आहे. त्याचबरोबर आरेचा विकास असेल किंवा बारसू रिफायनरच्या विषयावर सुद्धा त्याने सरकारला जोरदार टोला लगावला असून, सरकार दडपशाही करून आमच्याच लोकांना अश्रुधारा कांड्या फोडत आहे. त्याने विकास होणार नाही असे सुद्धा आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले आहेत.
सरकार देत असलेली माहिती चुकीची आहे: आरटीआयची माहिती चुकीची आहे. यामध्ये कुठलेही एक वाक्यता नसल्यामुळे हे सगळे प्रश्न निर्माण होत आहेत. वेगळा टक्के वर सुद्धा लोकांना इतर काय होणार आहे. पर्यावरण टिकूनच आपल्याला शहरीकरण करावे लागेल शहरीकरण करत असताना बाहेर देशांमध्ये गार्डन असेल, उद्यान असतील, झाडा असतील, त्याचा प्रश्न सोडूनच केले जाते. त्याचा विचार या सरकारने करणे गरजेचे असल्याचे सुद्धा आदित्य ठाकरे यांनी म्हटलेले आहे. तसेच भाजप नेते निलेश राणे यांच्यावर तर छ छ त्यावर बोलतच नाही. असे म्हणत उपरोधिक टोला लगावला आहे. त्याचबरोबर पुण्यातल्या नदीपात्रामध्ये सुद्धा वृक्षतोड होणार आहे. त्या ठिकाणी सुद्धा त्यांनी आज भेट देण्याचे मान्य केला असून, सर्व लोकांचा ऐकून घेऊन विकास करणे गरजेचे आहे. तरच विकास शक्य असल्याचे सुद्धा आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.शिवसेनेच्या कार्यकर्त्यावर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षावर चुकीचे गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. जुने गुन्हे उकरून काढण्यात येत आहेत. ठाण्यात महिलेवर अन्याय झाला. त्या शिंदे या महिलेवरच गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. हे सरकार सूडबुद्धीने वागत असल्याचा आरोप सुद्धा यावेळी आदित्य ठाकरे यांनी केला आहे.