Spread the love

पुलाची शिरोली(प्रतिनिधी)विद्याधर कांबळे

शिरोली औद्योगिक वसाहतीमधील विहिरीत शिये येथील युवकाचा मृतदेह सापडल्याची घटना उघडकीस आली आहे.

याबाबत पोलिसांकडून व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, शिरोली औद्योगिक वसाहतीत प्रियदर्शनी कंपनीच्या मागे  श्री पाटील यांच्या मालकीची सांडपाण्याची विहीर आहे.आज सोमवारी सायंकाळी सहा च्या सुमारास तेथील लोकांना विहीरीमध्ये  युवकाचा मृतदेह तरंगताना आढळून आला. ही घटना तात्काळ तेथील लोकांनी शिरोली एमआयडीसी पोलीस स्टेशन ला कळविली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह बाहेर काढला. 

फिरोज खानसो मुजावर, वय ४३ ,रा.हनुमान नगर शिये,ता.करवीर असे या युवकाचे नाव असल्याचे समजले.या  मयत युवकाच्या डोक्यावर ,पाठीवर जखम आढळून आली आहे.तसेच तोंडात कापडाचा बोळा आढळून आला. यामुळे या युवकाचा घातपात झाला असल्याची शक्यता निदर्शनास आली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सीपीआर येथे पाठविला.घातपात केलेला  मृतदेह विहिरीत आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलीसांनी घटनास्थळी श्वान पथक बोलावून फिरविल्याने श्वान काही अंतरावर घुटमळले. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनिल गायकवाड हे करत आहेत.

घातपात की आत्महत्या ?

फिरोज हा शुक्रवारी सायंकाळी कोणालाही न सांगता घरातून निघून गेला होता. याबाबत ची फिर्याद त्याच्या मुलाने दिली होती.यावेळी त्याच्या मुलाने फिरोज चा नातेवाईकांसोबत वाद झाल्याचे सांगितले होते. आज फिरोज चा मृतदेह मिळाला असता त्याच्या डोक्यावर व पाठीवर वार आढळून आले.तसेच तोंडात कापडाचा बोळा आढळून आल्याने घातपाताची शक्यता बळावली आहे.