Spread the love

गावात मोठी तणावपूर्ण परिस्थिती

पुलाची शिरोली(प्रतिनिधी)विद्याधर कांबळे

पुलाची शिरोली येथील बजरंग दल जिल्हा विभागीय संयोजक निलेश शिंदे याच्यावर पुणे बेंगलोर महामार्गावर असणाऱ्या सेवा रस्त्यावर सांगली फाटा नजीक अज्ञात व्यक्तींनी रिव्हॉल्वर रोखून धमकी दिल्याने एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत पोलिसांकडून व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, गेली दोन दिवस पुलाची शिरोलीतील दोन मुस्लिम तरुणांनी हिंदू मुलींचे लैंगिक शोषण करून चित्रीकरण करून ब्लॅकमेलिंग करून लव्ह जिहाद केल्याने गावात तणावपूर्ण वातावरण आहे.

मंगळवारी या घटनेचा निषेध व्यक करण्यासाठी शिरोली गाव बंद ठेवण्यात आले होते. आज गावातील एका मंगल कार्यालयात आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यासाठी हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांची बैठक सुरू होती.
पण निलेश शिंदे हा या बैठकीस अनुपस्थित होता. तो या आंदोलनासंदर्भात चर्चा करण्यासाठी कोल्हापूर येथील वरीष्ठ पदाधिकारी यांच्याकडे गेला होता.तेथून तो परत पुलाची शिरोली कडे येत असताना दोन मास्क घातलेले अज्ञात युवक त्याचा पाठलाग करत होते. निलेश हा पंचगंगा नदी ओलांडून सेवा रस्त्याने सांगली फाटा नजीक आला असता त्या पाठलाग करणाऱ्या अज्ञात युवकांनी निलेश याच्या गाडी आडवी मारून थांबविले. त्याच्या दिशेने रिव्हॉल्वर रोखत तू लय पुढे पुढे करायला लागलास,तुला जिवंत सोडत नाही,अशी धमकी देऊन पोबारा केला.

ही घटना निलेश ने तात्काळ शिरोली एमआयडीसी पोलीस स्टेशन ला कळविली. पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. यावेळी निलेश हा प्रचंड भयभीत झाला होता.ही बातमी पुलाची शिरोली येथील सकल हिंदू समाजाच्या बैठक चालू असलेल्या ठिकाणी समजली.यानंतर ही बातमी वाऱ्यासारखी शिरोलीसह पंचक्रोशीत वाऱ्यासारखी पसरली.काही कालावधीतच हजारोंच्या संख्येने जनसमुदाय पोलीस स्टेशन ला जमा झाला.यावेळी हिंदुत्ववादी कार्यकर्ते प्रचंड आक्रमक झाले होते. जमाव ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता.त्यामुळे पोलीस स्टेशन बाहेर व गावात प्रचंड तणाव निर्माण झाला होता. ही घटना समजताच करवीर चे उपविभागीय अधिकारी सुजितकुमार क्षीरसागर यांनी पोलीस स्टेशन ला धाव घेतली. त्यांनी जमावाला शांत राहण्याचे आवाहन केले. कायदा व सुव्यवस्था राखण्याचे आवाहन केले.पण जमाव ऐकण्याच्या परिस्थितीत नव्हता. त्यामुळे पोलिसांची जादा कुमक व जलद कृती दलाल,व दंगल नियंत्रण दलाला पाचारण करण्यात आले.त्यानंतर जमाव पोलीस स्टेशन मधून निघून गेला.घटनेचे गांभीर्य ओळखून प्रशिक्षणार्थी पोलीस अधीक्षक आरांशा यादव यांनी पोलीस स्टेशन ला भेट देऊन घटनास्थळी व शिरोलीतील प्रमुख चौकाची पाहणी केली.