Spread the love

शिरोळ, जि. कोल्हापूर (वृत्तसेवा): गुरुवारी रात्री सुमारे ९.३० वाजता शिरोळमध्ये वादळी वाऱ्यासह गारांचा जोरदार पाऊस झाला. वीज वितरण कंपनीने सुरक्षेच्या कारणास्तव पुरवठा खंडित केला. त्यामुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झाले. विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर, गृहिणींच्या स्वयंपाकावर तसेच उद्योग-व्यवसायावर परिणाम दिसून आला.