खून करणेच्या प्रयत्नातून अब्दुलकादर बेपारी सह तिघांची निर्दोष मुक्तता
इचलकरंजी/महान कार्य वृत्तसेवा
व्यावसायीक वादातून इरफान रज्जाक बेपारी याचेवर चाकूने वार करून त्याचा खुन करनेचा प्रयत्न केलेच्या आरोपातील संशयीत अब्दुलकादर बेपारी, दाऊद अब्दुलकांदर बेपारी व शाहरूख आस्लम बेपारी यांची सबळ पुराव्या अभावी इचलकरंजी येथील जिल्हा व सत्र न्यायाधिश गांधीसो यांनी निर्दोष मुक्तता केली. संशयीतांच्या वतीने जेष्ठ विधिज्ञ अॅड. मेहबूब बाणदार यांनी काम पाहिले.
मटण विक्रीच्या व्यवसायाच्या वादातून 04 ऑक्टोबर 2017 रोजी जखमी इरफान हे त्यांचे दुकानासमोर थांबले असता व्यावसायिक वादातून संशयीतांपैकी कादर बेपारी यांनी इरफान वर चाकूने सपासप वार करून त्याला गंभीर जखमी केले. त्या अनुशंगाने पोलिसांनी संशयीतांना अटक करून न्यायालयात दोषारोपपत्र पाठविले होते.सदर खटल्याची सुनावणी इचलकरंजी येथील जिल्हा व सत्र न्यायालय मे. गांधीसो यांचे न्यायालयात सुरू झाली. सरकार पक्षावतीने जखमी, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, यांच्या साक्षी नोंदविण्यात आल्या. तथापि, जखमी इरफान यास झालेल्या जखमा कोणाकडून झाल्या, हे सरकारपक्षास सिध्द करता आले नाही, वैद्यकीय अधिकारी यांना जप्त केलेला चाकू पोलिसांकडून दाखविण्यात आलेला नाही, चाकू वरील रक्त हे जखमीचे आहे याबद्दल कोणताही पुरावा नाही, जप्ती घटणेनंतर उशीरा हे मुद्दे बचाव पक्षातर्फे न्यायालयात मांडण्यात आले. वरील सर्व निष्कर्ष नोंदवून मा. न्यायालयाने सर्व संशयीतांची निर्दोष मुक्तता केली.
