मुंबई / महान कार्य वृत्तसेवा
मुंबईत घरांच्या किंमती अव्वाच्या सव्वा वाढल्या आहेत. त्यामुळं अनेकांना म्हाडाची घरे खुणावत असतात. म्हाडाच्या लॉटरीत घर न लागल्याने अनेक जण दुसरे पर्याय चाचपडतात. असाच एक धक्कादायक प्रकार मुंबईत उघडकीस आला आहे. म्हाडाचे घर स्वस्त दरात देण्याचे आमिष दाखवत गृहिणीसह आठ जणांची 1 कोटी 46 लाख 75 हजार रुपयांची फसवणूक झाली आहे. या प्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. किरण बोडके, अशोक इंगोले आणि तुषार साटम असं या आरोपींचे नाव आहेत.
मालाड पश्चिमेला राहणाऱ्या तक्रारदार महिलेला घर खरेदी करायचे होते. त्याच इमारतीत राहणाऱ्या त्यांच्या पतीच्या मित्राने स्वस्तातले म्हाडाचे घर खरेदी करण्यासाठी राजू साटम नावाच्या व्यक्तीचे नाव सुचवले होते. त्यानुसार तक्रारदार महिलेने त्याची भेट घेतली. त्यावेळी त्याने मी म्हाडाचे फ्लॅट स्वस्तात मिळवून द्तो, अशी बतावणी केली.
आरोपींनी गोरेगाव पश्चिमेच्या पहाडी परिसरातील ई विंगमधील फ्लॅट क्रमांक 708 दाखवला आणि अश्रय चव्हाण या घरमालकाला 47 लाखांना तो विकायचा असल्याचे सांगितले. त्यांनी टोकन म्हणून 50 हजार रुपये आणि नंतर टप्प्याटप्याने एकूण 34 लाख रुपये तक्रारदार महिलेने दिले. मात्र इतके पैसे देऊनही आरोपींनी घराचा ताबा दिला नाही.
या आरोपींनी अशाच पद्धतीने आणखी सात जणांची फसणूक करण्यात आल्याचे तक्रारदार महिलेला समजले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच आरोपींकडे पैशांचा तगादा लावला आहे. परंतु आरोपींनी त्यांना कोणताही प्रतिसाद दिला नाही. तसंच त्यांचा फोन उचलणेही बंद केले.
1. म्हाडा लॉटरी घोटाळा म्हणजे काय?
म्हाडा लॉटरी घोटाळा हा असा प्रकार आहे ज्यात काही व्यक्ती स्वस्तात म्हाडाचे घर देण्याचे आमिष दाखवून लोकांची आर्थिक फसवणूक करतात. मुंबईतील एका प्रकरणात, गृहिणीसह आठ जणांची 1 कोटी 46 लाख 75 हजार रुपयांची फसवणूक झाली आहे.
2. या घोटाळ्यातील मुख्य आरोपी कोण आहेत?
या प्रकरणात किरण बोडके, अशोक इंगोले आणि तुषार साटम या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
3. हा घोटाळा कसा घडला? तक्रारदार महिलेला स्वस्तात म्हाडाचे घर मिळवून देण्याचे आश्वासन देण्यात आले. आरोपींनी गोरेगाव पश्चिमेच्या पहाडी परिसरातील ई विंगमधील फ्लॅट क्रमांक 708 दाखवला आणि तो 47 लाखांना विक्रीसाठी असल्याचे सांगितले. महिलेनं टोकन म्हणून 50 हजार रुपये आणि टप्प्याटप्प्याने 34 लाख रुपये दिले, पण घराचा ताबा मिळाला नाही.
