Spread the love

सांगलीच्या विजय शिंदे याचा अनेकांना गंडा

सांगली / महान कार्य वृत्तसेवा

नामवंत कंपनीत वसुली अधिकारी म्हणून नोकरी लावतो असे बतावणी करून आळते (ता.हातकणंगले) येथील प्रदीप बापुसो कोळी या तरूणास सायबर क्राईममध्ये अडकवण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. विजय शिंदे (रा.सांगली) असे ठकसेनाचे नाव आहे. दरम्यान, फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर प्रदीप कोळी यांनी पोलीसात तक्रार देण्याचा प्रयत्न केला परंतू, पोलीसांनी उडवा-उडवी केल्याने कोळी कुटूबिय भितीच्या छायेखाली आहे.

याबाबत प्रदीप कोळी यांनी सांगितलेली अधिक माहिती अशी की, फेडरल बँकेतील नोकरी सोडल्यानंतर मी कामाच्या शोधात होता. मोबाईलवरून बालाजी इंडस्ट्रीज या नामांकित कंपनीत वसुली अधिकारी पाहिजे, अशी जाहिरात कोळी यांना पहायला मिळाली. नोकरीची गरज असल्याने त्या जाहिरातीतील नबंरवर त्यांनी संपर्क साधला. 7 जुलै रोजी विजय शिंदे यांनी फोन करून इचलकरंजीमध्ये भेटण्यास बोलावले. नोकरीच्या कामकाजाची पध्दत सांगितले. बालाजी कोको आईल मशिन विक्री आणि वसूली करण्याची जबाबदारी कोळी यांच्याकडे दिली. त्यांनी कोळी यांच्याकडून आधारकार्ड, पॅनकार्ड, बँक पासबूक घेवून, त्या आधारे नवीन क्यूआरकोड तयार केला. या अकौंटवरतील पैसे जमा होत राहतील. जाम झालेले पैसे मला रोखीने द्या.

जमा होत राहिलेले पैसे कोळी यांनी शिंदे यांना सांगली, इचलकरंजी, जयसिंगपूर, हातकणंगले आदी ठिकाणी एटीएममधून काढून दिले. 25 ऑगस्ट रोजी कोळी यांच्या खात्यावर १० हजार रूपये जमा झाले. त्यांना सांगली विश्रामबाग याठिकाणी शिंदे यास दिले. त्यानंतर २६ ऑगस्ट रोजी रात्री ९ वा.३०मी. स्टेट बँकेतून आकौंट होल्ड केल्याचा मेसेज आला. तत्पूर्वी कोळी यांनी पत्नी पुजा, आई सुवर्णा यांच्या खात्यावर स्वत:च्या खात्यावरून २२, २३ आणि २५ ऑगस्ट रोजी पैसे ट्रान्सफर केले होते. तेही खाते होल्ड करण्यात आले आहेत. त्यानंतर बँकेतील अधिकाऱ्यांना मेसेज दाखविल्यानंतर त्यांनी तुमच्या खात्याचा आधार घेवून फसवणूक केल्याचे सांगितले. यासंदर्भात कोळी यांनी शिंदे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असते शिंदे यांना संपर्क होऊ शकला नाही.

शिंदे यांना आत्तापर्यंत ३ लाख ९० हजार रूपये रोखीने काढून दिल्याचे कोळी यांनी सांगितले. सायबर क्राईमची तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात गेलो असता, तक्रार पोलीसांनी घेतली नसल्याचेही कोळी यांनी सांगितले.