मुंबई / महान कार्य वृत्तसेवा
मराठी मनोरंजन विश्वातून एक दु:खद बातमी समोर येत आहे. प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते बाळ कर्वे यांचं निधन झालं. वयाच्या 86व्या वर्षी त्यांनी मुंबईत अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने मराठी चित्रपटविश्वावर शोककळा पसरली आहे. अभिनय क्षेत्रात त्यांनी मोलाची कामगिरी बजावली. त्यांच्या निधनाने निर्माण झालेली पोकळी कधीही न भरून निघणारी आहे.
1979 साली दूरदर्शन प्रसारित झालेल्या चिमणराव या मालिकेत त्यांनी गुंड्याभाऊची भूमिका साकारली होती. या भूमिकेनं त्यांनी खरी ओळख मिळवून दिली. त्यांना इंडस्ट्रीतही गुंड्या भाऊ या नावानं ओळखलं जात होतं. पुण्याचे इंजिनिअर ते अभिनेते असा त्यांचा प्रवास अविस्मरमीय होता.
त्यांनी अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये विविध भूमिका साकारल्या. बन्याबापू (1978),लपंडाव ( 1993), गोडी गुलाबी ( 1991 ), चातक चांदणी ( 1992 ) हे त्यांचे काही गाजलेले सिनेमे आहेत.
