मुंबई / महान कार्य वृत्तसेवा
मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी काल (27 ऑगस्ट) अंतरवाली सराटीतून मुंबईच्या दिशेने रवाना झालेले मनोज जरांगे पाटील आता शिवनेरीवर दाखल झालेत. शिवनेरीवर दाखल होताच मनोज जरांगे यांनी माध्यमांशी संवाद साधत समाजाच्या लेकरांच्या वेदनांना न्याय मिळाला पाहिजे, याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साथ दिली पाहिजे, असं म्हणाले. तसेच आम्ही मुंबईला जाणारचं, असंही मनोज जरांगे यांनी सांगितले. तसेच मराठ्यांच्या मागण्यांची अंमलबजावणी करा, आडमुठी भूमिका सोडून द्या, असंही मनोज जरांगे देवेंद्र फडणवीसांना म्हणाले.
शिवनेरीवरुन मनोज जरांगेंची पत्रकार परिषद, काय काय म्हणाले?
रायगड, शिवनेरी येथून प्रेरणा मिळते. खूप मोठ्या वेदना आहेत हे देवेंद्र फडणवीसांनी समजून घेतलं पाहिजे. मराठा समाजाच्या लेकरांच्या वेदनांना न्याय मिळाला पाहिजे, त्याला मुख्यमंत्र्यांनी साथ दिली पाहिजे. देवेंद्र फडणवीस कुणाला थांबवणार नाहीत, असं मनोज जरांगे म्हणाले. न्यायालयाने जे सांगितलं त्याप्रमाणे आम्हाला करावं लागलं. न्यायदेवतेनं सांगितलं परवानगी घ्या…त्यानंतर 1 दिवसाची आंदोलनाची परवानगी ही चेष्टा आहे. मागण्यांची अंमलबजावणी होईपर्यंत परवानगी देऊ शकता. जाणूनबुजून तुम्ही एक दिवसाची परवानगी दिली, अशी टीका मनोज जरांगेंनी सांगितले.
शिवनेरी किल्ल्यावरुन तु्म्हाला शब्द देतो…, मनोज जरांगे म्हणाले?
देवेंद्र फडणवीस यांच्याकडे अजूनही संधी आहे. या संधीचं सोनं करा, असं मनोज जरांगे म्हणाले. तुम्ही आमचे वैरी नाहीत. फक्त मराठाविरोधी भूमिका सोडा, असंही मनोज जरांगेंनी सांगितले. मी शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्यावरुन सांगतो…देवेंद्र फडणवीसांकडे योग्य संधी आहे. तुम्ही मराठांच्या मागण्यांची अंमजबजावणी करा…हेच मराठे तुम्हाला मरेपर्यंत तुमचे उपकार विसरणार नाही, हा आमचा शब्द आहे, असं मनोज जरांगे म्हणाले.
