विरार / महान कार्य वृत्तसेवा
विरार पूर्व येथील चामुंडानगरमधील रमाबाई अपार्टमेंट कोसळली. या दुर्घटनेत आतापर्यंत 15 जणांचा मृत्यू झाला आणि नऊ जण जखमी झाले. सर्व मृतांची ओळख पटविण्यात आली आहे. जखमींवर उपचार सुरू आहेत. वसई – विरार महापालिका प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार इमारत दुर्घटनेत ज्या 15 जणांचा मृत्यू झाला त्यात एक वर्षाच्या चिमुरडीचाही समावेश आहे. मृतांमध्ये उत्कर्षा जोवील या एक वर्षाच्या चिमुरडीचा तसेच 11 वर्षांच्या अर्णव निवळकर याचाही समावेश आहे.
जखमी झालेल्यांपैकी प्रदीप कदम आणि जयश्री कदम या दोघांना उपचारांनंतर प्रकृती सुधारल्यामुळे डॉक्टरांनी घरी जाण्याची परवानगी दिली आहे. इतर सात जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मृतांच्या नातलगांनी वैद्यकीय अधिक्षक डॉ. कैलास राठोड, ग्रामीण रुग्णालय, विरार यांच्याशी 9527961221 या मोबाईलवर क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
मृतांची नावं : आरोही जोवील (24), उत्कर्षा जोवील (1), लक्ष्मण सिंग (26), दिनेश सकपाळ (43), सुप्रिया निवळकर (38), अर्णव निवळकर (11), पार्वती सकपाळ (60), दिपेश सोनी (41), सचिन नेवाळकर (40), हरिश बिष्ट (34), सोनाली तेजाम (41), दिपक बोहरा (25), कशीश सहेनी (35), शुभांगी सहेनी (40), गोविंद रावत (28)
जखमींची यादी
उपचारांनंतर घरी सोडण्यात आलेले – प्रदीप कदम (40), जयश्री कदम (33)
तुळींज हॉस्पिटलमध्ये असलेले जखमी – प्रभाकर शिंदे (57), प्रेरणा शिंदे (20)
प्रकृती हॉस्पिटल, बोळींज, विरार पश्चिम येथे असलेले जखमी – प्रमिला शिंदे (50), संजॉय सिंग (24), मंथन शिंदे (19), विशाखा जोवील (24)
संजीवनी हॉस्पिटल, विरार पश्चिम येथे असलेले जखमी – मिताली परमार (28)
