इचलकरंजी / महान कार्य वृत्तसेवा
पोलीस ठाण्यात विविध स्वरूपाचे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या इचलकरंजी परिसरातील बच्चन कांबळे ऊर्फ बी.के. गँगचा म्होरक्या राजकुमार ऊर्फ बच्चन लक्ष्मण कांबळे याच्यासह गँगमधील 13 जणांना एक वर्षासाठी कोल्हापूर जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे.
या कारवाईत राजकुमार ऊर्फ बच्चन लक्ष्मण कांबळे , गणेश राम ऊर्फ संतोष कांबळे , पृथ्वीराज ऊर्फ भैया संतोष कांबळे , आदित्य अविनाश निंबाळकर, स्वप्निल सोमनाथ तारळेकर , समाधान साधू नेटके , अर्जुन लक्ष्मण भोसले , यश सुभाष निंबाळकर , ओंकार श्रीपती ढमणगे , सुमित बच्चन ऊर्फ राजकुमार कांबळे , प्रेम शंकर कांबळे , बालाजी ऊर्फ अविनाश अर्जुन आवळे आणि ऋत्विक भारत गवळी सर्व रा. सहकारनगर साईट नं. 102 यांचा समावेश आहे.
खून, खुनाचा प्रयत्न, चोरी, घरफोडी यासह अन्य विविध गंभीर गुन्हे या टोळीतील संशयितांवर असल्याने या गुन्हेगारी टोळी विरोधात गावभागचे पो.नि. महेश चव्हाण यांनी महाराष्ट्र पोलिस अधिनियम 1951 चे कलम 55 प्रमाणे टोळी हद्दपारीचा प्रस्ताव पोलिस अधीक्षकांकडे सादर केला होता. त्याला अधीक्षकांनी मंजुरी दिली. त्यानुसार 13 जणांना एक वर्षासाठी जिल्ह्यातून हद्दपार केले आहे. याची माहिती कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या वतीने देण्यात आली आहे.
