मुंबई / महान कार्य वृत्तसेवा
विराट कोहलीने आपल्याकडं पाहिलं तरी देखील क्रिकेट फॅन्सला रात्ररात्रभर झोप येणार नाही. जर तुमची सोशल मीडिया पोस्ट विराट कोहलीच्या इन्टाग्राम पेजवरून लाईक केली गेली तर… टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर विराट कोहली याने काही महिन्यांपूर्वी अभिनेत्री अवनीत कौरच्या एका फॅन पेजवरील पोस्टला लाइक केलं होतं, ज्यामुळे खूप चर्चा झाली होती. आता अवनीतने अप्रत्यक्षपणे या प्रकरणावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. अवनीतच्या आगामी ‘लव्ह इन व्हिएतनाम’ या चित्रपटाच्या ट्रेलर लाँचवेळी अवनीतने यावर प्रतिक्रिया दिली.
‘लव्ह इन व्हिएतनाम’ या चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चचा कार्यक्रम पार पडला. तिथं अवनीतला प्रश्न विचारण्यात आला की, ‘ऑनलाईन सेलिब्रिटींकडून इतकं लक्ष आणि कौतुक मिळाल्यावर कसं वाटतं?’ त्यावर हसत अवनीत म्हणाली, प्रेम मिळत राहो, असं एका वाक्यात अवनीत प्रतिक्रिया दिली.
विराट कोहलीने मे महिन्यात अवनीत कौरच्या एका फॅन पेजवरील पोस्ट लाइक केली होती. काही वेळातच त्याने तो लाइक काढून घेतला, पण तोपर्यंत त्याचा स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यानंतर या प्रकरणावर अनेक चर्चा सुरू झाल्या आणि अखेर विराटला स्पष्टीकरण द्यावे लागले होते.
या प्रकरणावर विराटने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये लिहिले होते, ‘मी हे स्पष्ट करू इच्छितो की फीड साफ करताना, अल्गोरिदमने चुकून काहीतरी इंटरॅक्शन नोंदवले असावे असे वाटते. माझा असा कोणताही उद्देश नव्हता. कृपया कोणत्याही अनावश्यक चर्चा करू नका, असं म्हणत विराटने वादावर पडता टाकला होता. विराटने अवनीतच्या पोस्टला लाइक करताच, सोशल मीडियावर यूजर्सनी विविध कमेंट्स करण्यास सुरुवात केली होती.
