Spread the love

कराड (सातारा) / महान कार्य वृत्तसेवा

पतीच्या निधनानंतर निता जाधव या आपल्या मुलांना घेऊन आयुष्य जगत होत्या. त्या एका इलेक्ट्रॉनिक्स दुकानात काम करत होत्या. काम करत असताना त्यांनी ओळख शैलेंद्र नामदेव शेवाळे याच्यासोबत झाली. 2007 पासून निता आपल्या मुलांना घेऊन शैलेंद्रसोबत कोयना वसाहतीत राहत होत्या.

18 सोबत राहिल्यानंतर शैलेंद्र निता यांच्यावर चारित्र्यावरून संशय घेऊ लागला. त्यांना मारहाण करू लागला. दिवसेंदिवस हा वाद वाढतच चालला. सोमवारी दुपारी कपडे वाळत घालत असताना शैलेंद्रच्या डोक्यात संशयाचं भूत शिरलं आणि त्याने मारहाण सुरू केली. त्यांचं डोकं भिंतीवर आदळलं, इतकंच नाहीतर त्यांच्या गळ्यावर चाकून वार केले. इथेच तो थांबला नाहीतर निता यांना खोलीत कोंडून निघून गेला.

जखमी अवस्थेतही निता यांना मुलांना फोन केला आणि घडलेली घटना सांगितली. मुलांना त्वरीत त्यांच्या आईला रुग्णालयात हालवले. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहे. निता यांनी दिलेल्या तक्रारीवरून शैलेंद्र यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.