Spread the love

मुंबई / महान कार्य वृत्तसेवा

भाजपचे आमदार अमित साटम यांची मुंबई भाजपच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबत आज महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ही घोषणा करण्यात आली. मुंबईतील नागरी प्रश्नांची चांगली जाण आहे. अमित साटम यांनी विधानसभा आणि विविध व्यासपीठांवर भाजपची बाजू आक्रमकपणे मांडण्याचे काम केले आहे. यामुळे अमित साटम यांना मुंबई भाजपच्या अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली.

कोण आहेत अमित साटम?

अमित साटम हे भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत. ऑक्टोबर 2014 पासून ते सलग तिसऱ्या कार्यकाळात अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य (आमदार) म्हणून काम करत आहेत. 15 ऑगस्ट 1976 रोजी मुंबई, महाराष्ट्र येथे जन्मलेल्या साटम यांनी 1998 मध्ये मुंबई विद्यापीठाच्या मिठीबाई कॉलेज ऑफ आर्ट्समधून राज्यशास्त्र आणि समाजशास्त्र या विषयात बॅचलर ऑफ आर्ट्स पूर्ण केले. पुढे त्यांनी महात्मा गांधी मिशन्स इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च, मुंबई विद्यापीठातून मास्टर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज (कार्मिक) ची पदवी घेतली, 2000 मध्ये पदवी प्राप्त केली.

विधानसभा निवडणुकीत विजयाची हॅट्रिक-

अंधेरी पश्चिम मतदारसंघ अस्तित्त्वात आल्यानंतर 2009 मध्ये याठिकाणी पहिल्यांदा निवडणूक झाली. त्यावेळी काँग्रेसच्या अशोक जाधव यांनी अंधेरी पश्चिममध्ये विजय मिळवला. मात्र, 2014 च्या मोदी लाटेत भाजपच्या अमित साटम यांनी अशोक जाधव यांचे वर्चस्व मोडून काढत याठिकाणी विजय मिळवला होता. 2019 मध्येही अमित साटम यांनी अंधेरी पश्चिममध्ये विजयाची पुनरावृत्ती केली होती. त्यानंतर 2024 मध्येही काँग्रेसच्या अशोक जाधवांचा पराभव करत अंधेरी पश्चिम मतदारसंघात विजयाची हॅट्रिक साधली.

2014, 2019 आणि 2024 च्या विधानसभेच्या निवडणुकीत किती मते मिळाली?

2009 च्या पहिल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे अशोक जाधव यांनी या जागेवरून विजय मिळवला. त्यानंतर त्यांनी शिवसेनेचे उमेदवार विष्णू कोरगावकर यांचा 32 हजार मतांनी पराभव केला. 2014 च्या निवडणुकीत अंधेरी पश्चिम मतदारसंघातून भाजपचे अमित साटम विजयी झाले. 2014 च्या निवडणुकीत अमित साटम यांनी काँग्रेसच्या अशोक जाधव यांचा 24 हजार मतांनी पराभव केला होता.  2019 मध्ये अमित साटम यांनी पुन्हा अशोक जाधव यांचा 18,962 मतांनी पराभव केला. 2024 च्या निवडणुकीत अमित साटम यांना 84, 981 मते मिळाली. त्याचवेळी काँग्रेसचे अशोक जाधव यांना 65, 382 मते मिळाली. अमित साटम यांनी अशोक जाधव यांचा 19, 599 मतांनी पराभव केला.

राजकाराणाआधी व्यावसायिक म्हणून केले काम-

अमित साटम यांचा जन्म मुंबईत एका मराठी कुटुंबात झाला. त्यांचे श्वेता साटमशी लग्न झाले असून त्यांना एक मुलगी आहे.राजकारणात येण्यापूर्वी साटम यांनी टाटा टेलिसर्व्‌ि‍हसेसमध्ये मानव संसाधन व्यावसायिक म्हणून काम केले. ते श्री श्री रविशंकर जी यांचे उत्कट अनुयायी आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली राजकारणात करिअर करण्यासाठी 2004 मध्ये त्यांची कॉर्पोरेट नोकरी सोडली. आमदार या नात्याने साटम यांनी अंधेरी पश्चिम येथील नागरी सुविधा सुधारण्यावर लक्ष केंद्रित करून विविध नागरी विकास प्रकल्पांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. उल्लेखनीय म्हणजे, त्यांनी जुहू बीचच्या सुशोभीकरणाचे नेतृत्व केले, त्याची स्वच्छता आणि सुरक्षा वाढवली.