मुंबई / महान कार्य वृत्तसेवा
अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग हे बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय स्टार्सपैकी एक आहेत. दोघेही स्टार पॅप्स आणि चाहत्यांच्या खूप जवळचे आहेत. दीपिका आणि रणवीर आपल्या चाहत्यांबरोबर सेल्फी काढण्यास कधीही मागे पुढं पाहत नाहीत. मात्र मुलगी दुआ हिचा चेहरा त्यांनी आतापर्यंत कोणाला दाखवला नाही. या जोडप्यानं सप्टेंबर 2024मध्ये पहिलं बाळ दुआचं जगात स्वागत केलं. आता दुआ लवकरच 1 वर्षाची होत आहे. आतापर्यंत या जोडप्यानं मुलीचा चेहरा लपवून ठेवला आहे. दीपिका सार्वजनिक ठिकाणी गेली तर आपल्या मुलीचा चेहरा लपवून ठेवते. अलीकडेच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, यामध्ये दुआचा चेहरा हा दिसत आहे. आता हा व्हिडिओ पोस्ट करणाऱ्या युजर्सवर लोक भडकले आहेत.
व्हिडिओमध्ये काय आहे? : या व्हिडिओमध्ये दीपिका मुलगी दुआला आपल्याबरोबर घेवून जाताना दिसत आहे. दीपिकाला कळताच तिचा आणि दुआचा व्हिडिओ बनवला जात आहे, ती थोडी अस्वस्थ झाली. त्यानंतर ती त्या व्यक्तीला व्हिडिओ बनवण्यापासून थांबविण्यात प्रयत्न करते. व्हिडिओमध्ये दीपिकानं दुआला आपल्या कडेवर घेतलं आहे. दीपिका आणि दुआचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. यानंतर लोकांनी म्हटलं की दुआ अगदी वडील रणवीरसारखी दिसते. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर रणवीर-दीपिकाचे चाहत्यांनी याला डिलीट करण्याची मागणी केली होती. व्हिडिओवर यूजरनं नाराजी व्यक्त केली : एका चाहत्यानं या व्हिडिओच्या पोस्टमध्ये लिहिलं,’आत्ताच दुआचा चेहरा पाहिला, दीपिकानं सांगितलं की, तिला तिच्या बाळाचा चेहरा दाखवायचा नाही आणि तरीही एका चाहत्याला व्हिडिओ बनवण्याची गरज वाटली, व्हिडिओ क्लिपमध्ये तुम्ही पाहू शकता की, दीपिका आनंदी नाही आणि तरीही तुम्ही ते शेअर केले आहे.’ आणखी एकानं लिहिलं, ‘डिलिट करा ‘ दरम्यान दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांनी इटलीच्या सुंदर लेक कोमो येथे 2018मध्ये लग्न केलं. या जोडप्याच्या लग्नाला कुटुंब आणि काही जवळचे मित्र उपस्थित होते. या दोघांचं लग्न कन्नड आणि सिंधी रितीरिवाजांनी झालं आहे. यानंतर दोघांनी मुंबईत एक भव्य रिसेप्शन दिलं होतं. या जोडप्याच्या लग्नाला 6 वर्ष झाले आहेत. यानंतर दोघांनी 2024मध्ये गरोदरपणाची घोषणा केली. या जोडप्याला सप्टेंबरमध्ये दुआ झाली. आतापर्यंत या दोघांनी आपल्या मुलीचा चेहरा उघड केला नाही.
