Spread the love

मुंबई / महान कार्य वृत्तसेवा

अवघ्या काही दिवसांवर गणेशोत्सव येऊन ठेवला असून महाराष्ट्रात तो मोठ्या धुमधडाक्यात साजरा करण्यात येतो. गणेशोत्सव हा 11 दिवस असतो आणि याचा आनंद पूरेपूर घेता यावा म्हणून शाळांना सुट्टी देण्यात येते. मुंबई, पुण्यात आणि इतर शहरांमध्ये कामानिमित्त राहणारे कोकणवासीय गणेशोत्सवासाठी कोकणात गावी जातात. त्यामुळे याकाळात विद्यार्थ्यांना शाळेला सुट्टी देण्यात येते. यंदा गणपतीमध्ये शाळांना नेमकी किती दिवस सुट्ट्‌‍या आहे याबद्दल महत्त्वाची बातमी समोर आली आहे.

गणेशोत्सावासाठी शाळेंना 5, 7 की 9 नेमक्या किती दिवस सुट्ट्‌‍या?

गणपतीचं आगमन गणेश चतुर्थीला म्हणजे 27 ऑगस्टला होणार आहे. तर गणेशाचं विसर्जन हे गणेश चतुर्दशीला 6 सप्टेंबरला होणार आहे. तर गणपतीपाठोपाठ तीन दिवस गौराईचं आगमन होतं असतं. मुंबईसह कोकणातील सरकारी शाळांना नेहमी 5 दिवसांच्या सुट्ट्‌‍या असतात. पण यंदा विद्यार्थ्यांची मजा आहे कारण त्यांना यावेळी 7 दिवसांच्या सुट्ट्‌‍या मिळाल्या आहेत.

यामागील कारण म्हणजे यंदा गौराईचं आगमन 31 ऑगस्ट 2025 ला होणार असून 1 सप्टेंबरला गौरी पूजा आणि 2 सप्टेंबरला गौरी गणपती विसर्जन असणार आहे. कोकणात गौराईसह बाप्पाचे विसर्जन करण्यात येतं. त्यामुळे ज्या घरात गौराई आहे तिथे 5 दिवसांच्या बाप्पाचे विसर्जन 7 दिवसांनी होणार आहे. त्यामुळे मुंबईसह कोकणातील सरकारी शाळा प्रशासनाने यंदा विद्यार्थ्यांना 7 दिवस सुट्ट्‌‍या दिल्या आहेत. त्याशिवाय सरकारी बोर्ड सोडता इतर बोर्ड म्हणजे सीबीएसी, आयसीसी बोर्ड शाळांना मुंबईत 5 दिवसांच्या सुट्ट्‌‍या असणार आहे.

मुंबई, कोकण वगळता इतर ठिकाणी किती दिवस सुट्ट्‌‍या?

गणेशोत्सावात मुंबई, कोकण वगळता विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रात 27 ऑगस्ट गणेश चतुर्थी, 1 सप्टेंबर गौराई पूजन, 5 सप्टेंबरला ईद – ए – मिलाए आणि 6 सप्टेंबर गणेश विर्सजनाची सुट्टी असते. गणेशोत्सवाचे कलेंडर पाहिल्यास ज्या शाळांना शनिवार रविवार सुट्ट्‌‍या आहेत. तिथे वरील सांगितलेला चार दिवसांच्या सुट्ट्‌‍या आणि त्यात दोन शनिवार – दोन रविवार यांची मोजणी केल्यास 8 दिवसांची सुट्टी विद्यार्थ्यांना गणेशोत्सव काळात शाळांना मिळणार आहेत.

 तर दुसरीकडे 11 दिवसांच्या गणेशोत्सव काळात विद्यार्थ्यांना 11 दिवसांमध्ये 9 दिवस सुट्ट्‌‍या असणार आहे. 27 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर 2025 दरम्यान 7 दिवस सुट्ट्‌‍या असणार आहे. त्यानंतर 5 सप्टेंबरला ईद – ए – मिलाए, 6 सप्टेंबरला गणेश विसर्जन आणि 7 सप्टेंबरला रविवार अशा एकंदरीत 10 दिवस शाळांना मुलांना सुट्ट्‌‍या असणार आहेत. ज्या शाळांना 5 दिवस सुट्टी आहे, तिथे 5 आणि ईद – ए – मिलाए, गणेश विसर्जन आणि रविवार अशा मिळून 8 दिवस सुट्टी असणार आहे. तर कॉलेजबद्दलही स्थानिक पातळीवरही जवळपास त्यांना 11 दिवसांच्या काळात साधारण 7 – 8 दिवस सुट्ट्‌‍या असणार आहे. यंदा 11 दिवस गणेशोत्सव काळातील शाळेंना सुट्ट्‌‍या पाहिल्यास मुलांची धम्माल असल्याच पाहिला मिळतंय. आता तुम्ही पण यंदा गणेशोत्सव काळात तुमच्या सुट्टीचे नियोजन करा आणि गणरायाची भक्तीभावने पूजा करा आणि कुटुंबासोबत आनंदी वेळ व्यतित करा.