Spread the love

मुंबई / महान कार्य वृत्तसेवा

15 ऑगस्टपासून पावसाने मुंबईसह महाराष्ट्रात जोर धरला होता. अतिवृष्टीमुळे शाळांना सोमवार ते बुधवारी सुट्टी जाहीर करण्यात आली होती. दरम्यान गुरुवारी शाळांना सुट्टी आहे की नाही, याबाबत पालकांमध्ये संभम पाहायला मिळत आहे.

15 ऑगस्ट रोजी काही शाळांना स्वातंर्त्य दिन आणि गोपाळकाळानिमित्त सुट्टी जाहीर करण्यात आली होती. त्यानंतर शनिवारी आणि रविवारी सुट्टी होती. यानंतर सोमवारी 18 आणि 19 ऑगस्ट रोजी अतिवृष्टीमुळे मुंबईसह महाराष्ट्रात हवामान खात्याने रेड अलर्ट जाहीर केला होता. त्यामुळे प्रशासनाने सुट्टी जाहीर केली होती.

यानंतर 20 ऑगस्टबाबत राज्य सरकारने कोणताही निर्णय जाहीर केला नव्हता. मात्र काही शाळांनी खबरदारी म्हणून सुट्टी किंवा ऑनलाईन स्कूल जाहीर केली होती. कारण काही शाळा या सखल भागात असतात. तसेच माध्यमिकचे विद्यार्थी लहान असतात त्यांची काळजी घेणे आवश्यक असते. त्यामुळे त्यांच्या शाळा ऑनलाईन घेण्यात आल्या.

त्यामुळे आता पालकांना प्रश्न पडत आहे की, गुरुवारी शाळा असणार की नाही? तर पावसाचा जोर कमी झाला आहे. तसेच अद्याप कोणतीही अधिकृत माहिती मुंबई महानगरपालिका, ठाणे महानगरपालिका यांच्याकडून आलेली नाही. त्यामुळे शाळा या त्यांच्या सत्रात योग्य त्या वेळेत भरतील.

सततच्या मुसळधार पावसामुळे ठाणे, पनवेल, नवी मुंबई आणि लोणावळा येथील शैक्षणिक संस्था 20 ऑगस्ट 2025 रोजी बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. परिस्थिती कायम असल्याने, अनेक विद्यार्थी आणि पालकांना प्रश्न पडला आहे की प्रशासन मुंबईतही सुट्टी जाहीर करेल का? बीएमसीने अद्याप याबाबत कोणतीही अधिसूचना जारी केलेली नाही. अधिकाऱ्यांकडून नवीनतम अपडेट्‌‍ससाठी विद्यार्थ्यांना हे पेज तपासत राहण्याचा सल्ला देण्यात येत आहे.

बीएमसीने शाळेच्या सुट्टीबाबतच्या खोट्या बातम्यांचे खंडन केले आहे. अशी कोणतीही सूचना जारी केलेली नाही असे स्पष्ट केले आहे.

मुंबईत पावसाची विश्रांती

मुंबईसह महाराष्ट्रात आता पावसाने विश्रांती घेतली आहे. दुपारनंतर पावसाचा जोर कमी झाला असून हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. तसेच आज मुंबईची लाईफ लाईन ओळखली जाणारी लोकलच्या मध्य, पश्चिम आणि हार्बर या तिन्ही सेवा पुर्ववत सुरु होत्या. 20 ऑगस्ट रोजी सायंकाळी मोनोरेल 2 तास बंद पडली होती. पण आज मात्र मोनो पूर्ववत सुरु होती.