संगमनेर / महान कार्य वृत्तसेवा
कीर्तनकार संग्राम भंडारेंच्या घुलेवाडीत कीर्तनात गोंधळ झाला. या गोंधळानंतर संगमनेरसह अहिल्यानगर जिल्ह्यातलं राजकीय वातावरण तापलंय. संग्राम भंडारेंचं कीर्तनात गोंधळ घालणा-यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. कीर्तन बंद पाडण्यामागं राजकीय षडयंत्र असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी केलाय.
कीर्तनकार संग्राम भंडारेंच्या घुलेवाडीत कीर्तनात गोंधळ झाला. या गोंधळानंतर संगमनेरसह अहिल्यानगर जिल्ह्यातलं राजकीय वातावरण तापलंय. संग्राम भंडारेंचं कीर्तनात गोंधळ घालणा-यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. कीर्तन बंद पाडण्यामागं राजकीय षडयंत्र असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी केलाय. संग्राप भंडारे यांच्याबाबत वाद झाल्यानंतर बाळासाहेब थोरातांनी हरिनाम कीर्तन साप्तांहांमध्ये हजेरी लावण्याचा सपाटा लावलाय. त्यांनी एकाच दिवशी पाच ठिकाणी कीर्तन सोहळ्यांना हजेरी लावली. तसंच कीर्तनातून राजकीय भाष्य टाळलं पाहिजे अशी भूमिका त्यांनी मांडली…काँग्रेसनं संगमनेर शहरात उद्या शांतीमोर्चाची हाक दिलीय. दरम्यान संग्राम भंडारे यांच्या समर्थनात निफाड शहरातही बंद पाळण्यात आला होता. दुसरीकडं आता भाजपही आलीय. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी संग्राम भंडारे यांच्या हिदुंत्ववादी भूमिकेला पाठिंबा असल्याचं जाहीर केलंय.
हिंदुत्ववादी कीर्तनकार हभप संग्रामबापू भंडारे यांच्यावर संगमनेर येथे झालेल्या हल्ल्याचा राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप यांनी निषेध केलाय…ही घटना संगमनेर येथे घडल्याने यामध्ये राजकीय वास येत असल्याचा आरोप जगताप यांनी केलाय. घटनेच्या एक दिवस सोशल मीडियावर काही पोस्ट फिरत होत्या ज्यात असा हल्ला करणार असल्याचा उल्लेख असल्याची चर्चा सुरू होती असं जगताप यांनी म्हंटलंय. सोबतच या प्रकरणाचा पोलीस प्रशासनाने सखोल तपास करायला हवा, संग्राम बापू यांच्याबाबत घडलेला प्रकार आम्ही खपवून घेणार नाही असं आमदार संग्राम जगताप यांनी म्हंटलंय
संग्राप भंडारे यांच्याबाबत वाद झाल्यानंतर बाळासाहेब थोरातांनी हरिनाम कीर्तन साप्तांहांमध्ये हजेरी लावण्याचा सपाटा लावलाय. त्यांनी एकाच दिवशी पाच ठिकाणी कीर्तन सोहळ्यांना हजेरी लावली. तसंच कीर्तनातून राजकीय भाष्य टाळलं पाहिजे अशी भूमिका त्यांनी मांडली. काँग्रेसनं संगमनेर शहरात उद्या शांतीमोर्चाची हाक दिलीय. महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी संग्राम भंडारे यांच्याविरोधात पोलीस कारवाई करत नाही याच्या निषेधार्थ राहाता पोलीस ठाण्याबाहेर आंदोलन केलं. भंडारे कीर्तनातून सामाजिक तेढ निर्माण करत असल्याचा आरोप काँग्रेस कार्यकर्त्यांनी केलाय.
दरम्यान संग्राम भंडारे यांच्या समर्थनात निफाड शहरातही बंद पाळण्यात आला होता. दुसरीकडं आता भाजपही आलीय. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी संग्राम भंडारे यांच्या हिदुंत्ववादी भूमिकेला पाठिंबा असल्याचं जाहीर केलंय. विधानसभा निवडणुकीतल्या पराभवानंतर बाळासाहेब थोरात विरुद्ध आमदार अमोल खताळ हा संघर्ष सुरुच आहे. संग्राम भंडारेंच्या कीर्तनाच्या निमित्तानं या संघर्षाला आता धार आलीये. या प्रकरणात कोणीही माघार घेण्याच्या मनस्थितीत नाही. त्यामुळं येत्या काळात या कीर्तनावरुन मोठा राजकीय राडा होण्याची चिन्हं आताच दिसू लागलीयेत.
