Spread the love

मुंबई / महान कार्य वृत्तसेवा

राज्यात मोसमी पाऊस सक्रिय झाला आहे. मुंबईसह कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात सलग चार दिवस मुसळधार पाऊस कोसळत आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांत सर्वाधिक पावसाची नोंद कोल्हापूर जिल्ह्यात झाली आहे.

सध्या राज्यात पावसाला पोषक वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे अनेक भागात मागील तीन दिवसांपासून पाऊस कोसळत आहे. संपूर्ण राज्यात सोमवारी पावसाचा जोर अधिक होता. अनेक भागात संपूर्ण दिवसभर पाऊस कोसळला. त्यानंतर सोमवारी मध्यरात्री देखील पावसाचा जोर कायम होता. यामुळे काही ठिकाणी पाणी साचले होते. दरम्यान, गेल्या 24 तासांत सर्वाधिक पावसाची नोंद कोल्हापूर जिल्ह्यातील गगनबावडा येथे झाली आहे .तेथे सकाळी 8.30 ते मंगळवारी सकाळी 8.30 पर्यंत 261 मिमी पावसाची नोंद झाली आहे.

सोमवारी सकाळी 8.30 ते मंगळवारी सकाळी 8.30 पर्यंत झालेली पावसाची नोंद (जिल्हानिहाय)

रत्नागिरी

दापोली – 230 मिमी

मंडणगड – 168 मिमी

चिपळूण – 150 मिमी

संगमेश्वर – 134 मिमी

लांजा – 214.5 मिमी

खेड – 155 मिमी

गुहागर – 122 मिमी

सिंधुदुर्ग

वैभववाडी – 230 मिमी

दोडामार्ग – 60 मिमी

मालवण – 58 मिमी

कुडाळ – 98 मिमी

कणकवली – 120 मिमी

मुळदे – 103.4 मिमी

रामेश्वर – 116.2 मिमी

सावंतवाडी – 93 मिमी

देवगड – 131 मिमी

कोल्हापूर

राधानगरी – 221 मिमी

गगनबावडा – 261 मिमी

कागल – 66 मिमी

शाहूवाडी – 161 मिमी

पन्हाळा – 47 मिमी

चंदगड – 46 मिमी

आजरा – 35 मिमी

गडहिंग्लज – 57 मिमी

हातकणंगले – 58 मिमी

शिरोळ – 13 मिमी

सांगली

वाळवा- 16 मिमी

तासगाव – 14 मिमी

शिराळा – 53 मिमी

आटपाडी – 19 मिमी

कडेगाव – 20 मिमी

कवठे महाकाळ- 6 मिमी

पलूस – 7 मिमी

कसबेडिगरज- 23.8 मिमी

मिरज – 26 मिमी

कोकरुड – 56 मिमी

संख- 18 मिमी

पुणे

लवाळे – 46.5 मिमी

पाषाण – 43 मिमी

चिंचवड – 39.5 मिमी

शिवाजीनगर – 35.2 मिमी

तळेगाव – 34 मिमी

हडपसर – 20.5 मिमी

मगरपट्टा – 20.5 मिमी

हवेली – 16.5 मिमी

गिरीवन – 10.5

निमगिरी – 9 मिमी

डुडुळगाव – 8.5 मिमी

राजगुरुनगर – 6.5 मिमी

बारामती – 6.2 मिमी

दौंड – 5.5 मिमी

ढमढेरे – 4 मिमी

दापोडी – 4 मिमी

माळिन – 3 मिमी

घाट परिसरातील 24 तासांत झालेला पाऊस

ताम्हिणी – 320 मिमी

नवजा- 308 मिमी

दाजीपूर – 303 मिमी

डोंगरवाडी – 271 मिमी

भिरा- 261 मिमी

गगनबावडा – 260 मिमी

माथेरान – 255 मिमी

गजापूर – 239 मिमी

सावर्डे – 233 मिमी

वरंडोली – 226 मिमी

दवडी – 225 मिमी

आंबोली – 222 मिमी

पोफळी- 215 मामी

शिरगाव – 210 मिमी

भालवडी – 206 मिमी

मांडुकली – 204 मिमी

कोयनानगर – 207 मिमी

आंबवणे – 196 मिमी

दूधगंगा – 193 मिमी

घिसर – 192 मिमी

लोणावळा- 189 मिमी

कुंभेरी – 180 मिमी

महाबळेश्वर – 173 मिमी

खंडाळा – 167 मिमी

अतिमुसळधार पावसाचा इशारा मुंबईसह ठाणे, पालघर भागात मंगळवारी अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. या कालावधीत अनेक भागात मुसळधार पाऊस कोसळेल. याचबरोबर काही भागात जोरदार वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. त्यामुळे सखलभागात पाणी साचण्याची शक्यता आहे. गरज असेल तरच घराबाहेर पडावे, असे आवाहन हवामान विभागाने नागरिकांना केले आहे.