Spread the love

विशेष प्रतिनिधी / महान कार्य वृत्तसेवा

हातकणंगले शहरातील लक्ष्मी औद्योगिक वसाहती जवळील रस्त्यालगत असलेल्या समशानभूमीची नगरपंचायतीकडून बुधवारी भर पावसात साफसफाई करण्यात आली. त्यामुळे नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.
काही दिवसांपूर्वी स्मशानभूमीची दगडूजी करण्यात आली होती. परंतु त्यानंतर येथील स्वच्छतेकडे नगरपंचायतीने दुर्लक्ष केले होते. त्यामुळे स्मशानभूमी परिसरात प्रचंड दुर्गंधी आणि अस्वच्छता दिसत होती मध्यंतरी काही सामाजिक कार्यकर्त्यांनी या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवली परंतु सातत्य राखण्यात अडचणी आल्या. वास्तविक शहरातील सार्वजनिक वास्तूंची साफसफाई स्वच्छता आणि नीटनेटकेपणा राखण्याची जबाबदारी नगरपंचायतीची आहे परंतु याचा विसर नगरपंचायत ला पडला होता स्मशानभूमीची तर अत्यंत दैनिक अवस्था झाली होती अस्ताव्यस्त कचरा पडलेला होता भटक्या कुत्र्यांचं येथे निवासस्थान झालं होतं अंत्यविधीसाठी गेलेल्या नागरिकांच्या वर भटकी कुत्री धावून येत होती त्यामुळे लोक स्मशान भूमी कडे जाण्यास घाबरत होते. चार दिवसापूर्वी काही सामाजिक कार्यकर्त्यांनी ही गंभीर बाब नगरपंचायतीच्या निदर्शनास आणून दिली त्यानंतर मुख्याधिकारी विशाल पाटील यांनी मनावर घेऊन तातडीने स्मशानभूमीत कर्मचाऱ्यांच्या मार्फत स्वच्छता मोहीम राबवली औषध फवारणी करून मशानभूमी टकाटक केली भटक्या कुत्र्यांचाही बंदोबस्त करण्याचा प्रयत्न नगरपंचायतीकडून सुरू आहे एकूणच या प्रकारामुळे लोक समाधान व्यक्त करत आहेत.