विठ्ठल बिरंजे / महान कार्य वृत्तसेवा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महत्त्वकांक्षी योजना असलेल्या किसान सन्मान योजनेला जिल्ह्यात ब्रेक लागला आहे. 2019 नंतर नव्याने फेरफार झालेल्या जिल्ह्यातील ४००० शेतकऱ्यांना याचा फटका बसला आहे. तांत्रिक अडचणीमुळे हे शेतकरी माहे एप्रिल पासून सन्मानाच्या प्रतीक्षेत आहेत.
शेतकऱ्यांचा सन्मान झाला पाहिजे त्यांना त्यांच्या प्राथमिक खर्चासाठी आर्थिक सहाय्य करण्याच्या हेतूने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी किसान सन्मान योजना जाहीर केली. तातडीने या योजनेची अंमलबजावणी सुरू केली. या योजनेच्या माध्यमातून प्रत्येक शेतकऱ्याला महिन्याला 500 प्रमाणे वर्षाकाठी सहा हजार रुपये दिले जातात. दर चार महिन्यांनी शेतकऱ्यांच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यावर चार महिन्याचे एकत्रित पैसे दिले जातात. आतापर्यंत 19 हप्ते शेतकऱ्यांना मिळालेले आहेत. विसावा हप्ता देण्याची प्रक्रिया सुरू आहे.परंतु हे करत असताना मध्यंतरी 2019 ला ज्यांच्या शेतकऱ्यांच्या सातबारावर फेरफार झालेले आहेत. अशा शेतकऱ्यांना पैसे देणे बंद केले. तो फेरफार ऑनलाइन अपलोड केल्यानंतर पैसे देण्याची अट घालण्यात आली. एप्रिल 2025 पासून अनेक शेतकऱ्यांनी असे फेरफार नोंदणीसाठी महा-ई-सेवा केंद्रात हेलपाटे मारले. परंतु या नव्याने नोंदणीसाठी शासनाने पोर्टल लॉक केल्यामुळे शेतकऱ्यांची घोर निराशा झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात असे 4 हजारहून अधिक 2019 नंतर फेरफार झालेले शेतकरी आहेत. एप्रिल 2025 पासून ही साईट बंद झाल्यामुळे शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाहीत. सरासरी आतापर्यंत किमान दोन हप्ते या शेतकऱ्यांचे बुडालेले आहे. जिल्ह्यातील प्रत्येक गावामध्ये किमान 50 ते 60 शेतकरी असे आहेत की त्यांना या योजनेपासून वंचित राहावे लागलेल आहे. शासनाने याची गंभीर दखल घेऊन पोर्टल वरती सुविधा तातडीने उपलब्ध करून द्यावी अशी मागणी नोंदणीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांच्या तुन होत आहे.
20 व्या हप्त्यासाठी पोर्टल हँग
शेतकऱ्यांना विसावा हप्ता लवकरच मिळणार होता. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांचे फेरफार 2019 ला झालेले आहेत अशा शेतकऱ्यांसाठी पोर्टल हँग करण्यात आलं असे समजते. आता केंद्र सरकारकडून विसावा हप्ता जमा होत आहे किमान यानंतर तरी वंचित शेतकऱ्यांसाठी पोर्टल सुविधा सुरू करावी अशी मागणी शेतकऱ्यांची आहे.
