Spread the love

इचलकरंजी /महान कार्य वृत्तसेवा
भारतीय जनता पार्टी इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील पूर्व मंडल, पश्‍चिम मंडल आणि ग्रामीण मंडल यांची कार्यकारीणी पूर्व मंडल अध्यक्ष श्रीरंग खवरे, पश्‍चिम मंडल अध्यक्ष शशिकांत मोहिते व ग्रामीण मंडल अध्यक्ष बाळासाहेब माने यांनी जाहीर केली. यामध्ये महिला, युवा मोर्चा आघाडीसह विविध सेल अध्यक्षांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या.
काम करणार्‍या कार्यकर्त्यांनाच पदे देण्याचा भाजपामध्ये नियम आहे. या नियमावलीला अधीन राहून आमदार राहुल आवाडे, माजी वस्त्रोद्योग मंत्री प्रकाश आवाडे आणि माजी आमदार सुरेश हाळवणकर, जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक-निंबाळकर आणि वरिष्ठांसोबत चर्चा, विचारविनिमय करून तिन्ही मंडलाची कार्यकारणी जाहीर करीत असल्याचे खवरे, मोहिते व माने यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यामध्ये पूर्व मंडल महिला मोर्चा अध्यक्षपदी सौ. सीमा कमते व युवा मोर्चा अध्यक्षपदी सचिन पोवार, पश्‍चिम मंडल महिला मोर्चा अध्यक्षपदी सौ. सपना भिसे व युवा मोर्चा अध्यक्षपदी प्रमोद बचाटे तर ग्रामीण मंडल महिला मोर्चा अध्यक्षपदी पुनम भोसले व युवा मोर्चा अध्यक्षपदी अमर खोत यांची निवड करण्यात आली आहे.
इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात समाविष्ट तीन मंडलमध्ये प्रत्येकी 6 उपाध्यक्ष, 2 सरचिटणीस, 6 चिटणीस आणि 1 कोषाध्यक्ष अशा 16 जणांचा समावेश आहे. त्याशिवाय प्रत्येक मंडलमध्ये 5 महिलांनाही स्थान देण्यात आले आहे.
इचलकरंजी पूर्व मंडल उपाध्यक्षपदी संजय केंगार, राहुल घाट, उदय धातुंडे, अभयकुमार बाबेल, नजमा शेख, सौ. अर्चना कुडचे, सरचिटणीसपदी रवींद्र जावळे व अनिकेत पाटील, चिटणीसपदी अनुप पारीख, संजय गंथडे, वसंत वेटाळे, सुदर्शन कांबळे, महेश कांबळे, प्रताप लाखे तर कोषाध्यक्षपदी महावीर जैन यांची निवड करण्यात आली आहे. त्याचबरोबर पूर्व मंडलच्या महिला मोर्चा अध्यक्षपदी सौ. सीमा कमते, युवा मोर्चा अध्यक्षपदी सचिन पोवार, ओबीसी मोर्चा अध्यक्षपदी समीर मुल्ला, अनुसूचित जाती अध्यक्षपदी बापू गेजगे, अल्पसंख्यांक मोर्चा अध्यक्षपदी फारुक बागेवाडी, कामगार मोर्चा अध्यक्षपदी दशरथ मोहिते, पदवीधर प्रकोष्ठपदी नरेश पारीख, डॉक्टर सेल अध्यक्षपदी डॉ. कृष्णा रेड्डी, कायदा सेल अध्यक्षपदी अ‍ॅड. शिवकुमार लकडे, आयटी सेल अध्यक्षपदी स्वागत नानावटी, सोशल मिडीया सेल अध्यक्षपदी सिध्दार्थ पुजारी, शिक्षक आघाडी अध्यक्षपदी विशाल देसाई, दिव्यांग आघाडी अध्यक्षपदी भानुदास तासगांवे, सहकार आघाडी अध्यक्षपदी राजेंद्र बचाटे, व्यापारी आघाडी अध्यक्षपदी कमलेशकुमार राठी, उद्योग आघाडी अध्यक्षपदी अनिल कांबळे, अध्यात्मिक आघाडी अध्यक्षपदी योगेश पाटील, सांस्कृतिक आघाडी अध्यक्षपदी शाहीर संजय जाधव यांची निवड करण्यात आली आहे.
पश्‍चिम मंडल उपाध्यक्षपदी उत्तम विभुते, दत्तात्रय मांजरे, नागेश पाटील, उमाकांत दाभोळे, तानाजी भोसले, नागुबाई लोंढे, सरचिटणीसपदी महेश पाटील, शिवानंद रावळ, चिटणीसपदी सौ. नीता भोसले, रंजना डावरे, अलका विभुते, राजू पुजारी, शिवाजी सुर्वे, विनायक बडवे आणि कोषाध्यक्षपदी नरसिंह पारीक यांची निवड करण्यात आली आहेत. त्याचबरोबर महिला मोर्चा अध्यक्षपदी सौ. सपना भिसे, युवा मोर्चा अध्यक्षपदी प्रमोद बचाटे, अनुसूचित जाती जमाती अध्यक्षपदी सिध्दार्थ कांबळे, किसान मोर्चा अध्यक्षपदी ज्ञानेश्‍वर कोळी, अल्पसंख्यांक मोर्चा अध्यक्षपदी अबु पानारी, ओबीसी आघाडी अध्यक्षपदी संजय हणबर, कामगार आघाडी अध्यक्षपदी संदीप मांगलेकर, व्यापारी आघाडी अध्यक्षपदी कमलकिशोर तिवारी, उत्तर भारतीय आघाडी अध्यक्षपदी शुभम केसरवाणी, दक्षिण भारत आघाडी अध्यक्षपदी श्रीनिवास फुलपाटी, भटके विमुक्त आघाडी अध्यक्षपदी अनिल शिकलगार, वैद्यकिय आघाडी अध्यक्षपदी डॉ. पांडुरंग पिळणकर, सहकार आघाडी अध्यक्षपदी सुनिल तोडकर, कायदा आघाडी अध्यक्षपदी विजय शिंगारे, माजी सैनिक आघाडी अध्यक्षपदी अमर राऊत, सांस्कृतिक आघाडी अध्यक्षपदी पद्माकर कुरकुटे, सोशल मिडीया प्रमुखपदी माधव उपाध्याय, अध्यात्मिक समन्वय आघाडी अध्यक्षपदी प्रविण कुसुरकर, उद्योग आघाडी अध्यक्षपदी सुमित महाजन, क्रीडा आघाडी अध्यक्षपदी तात्या कुंभोजे, जैन प्रकोष्ठ अध्यक्षपदी विकास चौगुले, आयटी सेल अध्यक्षपदी सिध्दलिंग बुक्का, राजस्थान प्रकोष्ठ अध्यक्षपदी सतिश खंडेलवाल, ज्येष्ठ नागरिक आघाडी अध्यक्षपदी वसंत पोवार, शिक्षक आघाडी अध्यक्षपदी विशाल दास, विणकर आघाडी अध्यक्षपदी विशाल ढवणे, झोपडपट्टी आघाडी अध्यक्षपदी उत्तरेश्‍वर कांबळे यांची निवड करण्यात आली आहे.
ग्रामीण मंडल उपाध्यक्षपदी प्रमोद माने, शुभम नलवडे, संदीप कांबळे, शितल पाटील, जयकुमार काडाप्पा, निलेश पाटील, सरचिटणीसपदी वैभव पोवार, सुमेध ओऊळकर, चिटणीसपदी मनिषा कांबळष, ब्रह्मदेव अरुगाडे, सतिश सावंत, केतन शिंदे, मेघा दावणे, अजित खुडे तर कोषाध्यक्षपदी राकेश मगदुम यांची निवड करण्यात आली आहे. तर खोतवाडी अध्यक्षपदी संजय चोपडे, तारदाळ अध्यक्षपदी उमेश चोपडे, कोरोची अध्यक्षपदी सुहास पाटील, कबनूर अध्यक्षपदी बबन उर्फ सतिश केटकाळे, चंदूर अध्यक्षपदी दगडु वाघमोडे, महिला मोर्चा अध्यक्षपदी पुनम भोसले, युवा मोर्चा अध्यक्षपदी अमर खोत, अल्पसंख्यांक मोर्चा अध्यक्षपदी समीर जमादार, किसान मोर्चा अध्यक्षपदी राजू शिरगुप्पे, सोशलमिडीया अध्यक्षपदी मनोज जाधव, शिक्षक आघाडी अध्यक्षपदी रणजित माने, अध्यात्मिक आघाडी अध्यक्षपदी महादेव चौगुले, सहकार अघाडी अध्यक्षपदी सचिन चौगुले, अनुसूचित जाती मोर्चा अध्यक्षपदी विजय कांबळे आणि डॉक्टर सेल अध्यक्षपदी वैभव शिंदे याची निवड करण्यात आली आहे.
यावेळी तानाजी पोवार, पै. अमृत भोसले, मनोज हिंगमिरे, मनोज साळुंखे, राजू भाकरे, सपना भिसे, सीमा कमते आदी उपस्थित होते.