इचलकरंजी / महान कार्य वृत्तसेवा
येथील श्री आदिनाथ को ऑप. बँक लि., इचलकरंजी या बँकेच्या चेअरमन पदासाठीची निवड सोमवारी डॉ. एस. एन. जाधव, उपनिबंधकसो, सहकारी संस्था, हातकणंगले यांचे अध्यक्षतेखाली बँकेच्या प्रधान कार्यालयात झाली,या बैठकीत बाळासाहेब पारीसा चौगुले यांची चेअरमन पदी बिनविरोध निवड झाली. सदर निवडीकरीता संचालक श्रेणिक मगदूम यांनी चेअरमन पदासाठी बाळासाहेब चौगुले यांचे नांव सुचविले तर त्यास संचालक अनिल बम्मण्णावर यांनी अनुमोदन दिले.
सभेमध्ये सभा अध्यक्ष डॉ. एस. एन. जाधवसाो, तसेच बँकेचे व्हा. चेअरमन यांचेकडून नूतन चेअरमन यांचा सत्कार करणेत आला माजी चेअरमन सुभाष काडाप्पा सर यांचा सत्कार एस. एन. जाधव उपनिबंधकसो, हातकणंगले यांनी केले.
बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जयकुमार उपाध्ये यांनी स्वागत केले. बँकेच्या वाटचालीत सहकार महर्षि मा. खा. कल्लाप्पाणा आवाडे (दादा) व लोकप्रिय आमदार प्रकाशराव आवाडे (आण्णा) यांचे मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन नेहमिच लाभले आहे.
सभेस बँकेचे माजी चेअरमन मा. सुभाष काडाप्पा, विद्यमान व्हा. चेअरमन चंद्रकांत मगदूम, संचालक कुंतिलाल पाटणी, मधुकर मणेरे, चंद्रकांत मगदूम, सुदर्शन खोत, श्रेणीक मगदूम, अनिल बम्मण्णावर, संपत कांबळे, गुरुनाथ हेरवाडे, सुकुमार पोते, संचालिका सौ. मंगल देवमोरे, सौ. अनिता चौगुले सीईओ जयकुमार उपाध्ये, प्रशासनअधिकारी श्री.जे. बी. चौगुले उपस्थित होते. शेवटी संचालक अनिल बम्मण्णावर यांनी सर्वांचे आभार मानले.
